Google ने 14 ऑगस्ट रोजी भारतात आपली Google Pixel 9 सीरीज लॉन्च केली. या सीरीजअंतर्गत फोल्डसह चार हँडसेट लॉन्च करण्यात आले आहेत. कंपनीने Pixel 9 आणि Pixel 9 Pro XL चं प्री-बुकिंग सुरू आहे आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर लिस्टेट केले आहेत. 12 वाजल्यापासून हा सेल सुरू झाला आहे.
प्रीबुकिंग पेजवर दिलेल्या डिटेल्समध्ये असं म्हटलं आहे की, Pixel 9 Pro X वर दहा हजार रुपयांचा इन्संट डिस्काऊंट मिळेल, ज्यासाठी ICICI बँकेचं कार्ड वापरावं लागेल. त्याच वेळी, Pixel 9 वर चार हजार रुपयांचा इन्संट डिस्काऊंट मिळत आहे.
Pixel 9 आणि Pixel 9 Pro XL ची किंमत
Pixel 9 ची किंमत 79,999 रुपये आहे, ज्यामध्ये 128GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध असेल. Pixel 9 Pro XL ची किंमत 1,24,999 रुपये आहे. हा नवीन लाइनअप सहा रंगांच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. Google pixel 9 सीरीज ऑनलाइन आणि ऑफलाइन मोडमध्ये खरेदी केली जाऊ शकते. फ्लिपकार्ट व्यतिरिक्त, हा फोन क्रोमा, रिलायन्स डिजिटल सारख्या प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध असेल.
Google Pixel 9 स्पेसिफिकेशन
Google Pixel 9 मध्ये 6.3-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे. कंपनीने इन-हाऊस Tensor G4 प्रोसेसर वापरला आहे, त्यासोबतच तिने सुरक्षिततेसाठी Titan M2 चिपसेट दिला आहे.
Google Pixel 9 मध्ये डुअल कॅमेरा सेटअप आहे. यात 50-मेगापिक्सेल वाइड अँगल लेन्स आणि 48MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. या Pixel हँडसेटमध्ये 4700mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगसह येते. हा हँडसेट Android 14 वर काम करतो. याशिवाय कंपनी 7 वर्षांसाठी ओएस आणि सिक्युरिटी अपडेट्स देईल.
Google Pixel 9 Pro XL चे स्पेसिफिकेशन
Google Pixel 9 Pro XL मध्ये 6.8-इंचाचा 24-बिट LTPO OLED डिस्प्ले आहे, जो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शनसह येतो. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.
यात 50MP OCTA PD कॅमेरा आहे. दुसरा 48MP क्वाड PD टेलिफोटो कॅमेरा आणि तिसरा 48MP क्वाड PD अल्ट्रा वाइड फीचर ऑटोफोकससह आहे. यात Tensor G4 प्रोसेसर आहे. यात 5,060mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.