Google चे ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) इयरबड्स Pixel Buds A भारतात लाँच झाले आहेत. या इयरबड्समध्ये 12mm डायनॅमिक ड्रायव्हर देण्यात आला आहे. हे इयरबड्स 24 तासांचा बॅटरी बॅकअप देतात असा दावा गुगलने केला आहे. Google Pixel Buds A-Series TWS ची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे बड्स सफेद रंगात Flipkart, Reliance Digital आणि Tata Cliq वरून विकत घेता येतील. 25 ऑगस्टपासून उपरोक्त प्लॅटफॉर्म्सवर हे बड्स खरेदीसाठी उपलब्ध होतील.
Google Pixel Buds A चे स्पेसिफिकेशन्स
Pixel Buds A-Series TWS मध्ये IPX4 रेटिंग मिळते त्यामुळे हे वॉटर रेजिस्टंट बनतात. बाहेरील आवाज समोरच्या व्यक्तीला ऐकू न जात कॉल सुरळीत चालू राहावा म्हणून यात Beamforming Microphones देण्यात आले आहेत. किंमत कमी ठेवण्यासाठी कंपनीने यात स्वाइप जेस्चर कंट्रोल दिले नाहीत. हे TWS इयरफोन अडॅप्टिव साउंडच्या मदतीने आवाज कमी जास्त करतात.
या इयरबड्समध्ये 40 पेक्षा अधिक भाषांमध्ये रीयल-टाइम ट्रांसलेशन करू शकतात, ज्यात भारतीय भाषांचा देखील समावेश आहे. परंतु या आणि Fast Pair, Find my Device, Adaptive Sound सारख्या अनेक शानदार फीचर्ससाठी Pixel फोन किंवा Android 6.0 किंवा त्यावरील फोनची गरज लागेल. सिंगल चार्जमध्ये हे बड्स 5 तास चालतात. तसेच चार्जिंग केसच्या मदतीने यांचा बॅकअप 24 तास करता येतो.