गुगलने काही भारतीय एप्सवर मोठी कारवाई केली आहे. गुगलने 10 एप्स आपल्या Android Play Store वरून काढून टाकले आहेत. या यादीत अनेक मोठी नावं आहेत. यामध्ये Shaadi.com, Naukri.com, 99 एकर या नावांचा समावेश आहे. गेल्या वर्षी कंपनीने काही एप डेव्हलपर्सनाही इशारा दिला होता.
काही ॲप्स Google च्या बिलिंग पॉलिसीजमध्ये फेल झाल्याचे दिसून आले. यानंतर त्यांना इशारा देण्यात आला. आता अखेर 10 एप्सवर कारवाई करत गुगलने हे एप्स Google Play Store वरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गुगलने अद्याप सर्व डिस्प्यूटेड एप्सची यादी जाहीर केलेली नाही.
'या' एप्सवर करण्यात आली कारवाई
गुगलने काही एप्सवर कारवाई केली आहे ज्यांची नावे समोर आली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Kuku FM, Bharat Matrimony, Shaadi.com, Naukri.com, 99 acres, Truly Madly, Quack Quack, Stage, ALTT (Alt Balaji) आणि इतर दोन एप्स यांचा समावेश आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण सेवा शुल्क न भरण्याबाबत आहे. या कारणास्तव, तंत्रज्ञान जगतातील आघाडीच्या प्लॅटफॉर्मने हे एप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, अनेक स्टार्टअप्सना असे वाटत होते की गुगलने शुल्क आकारू नये आणि नंतर त्यांनी हे पेमेंट केलं नाही.
मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले. यामध्ये गुगलला हिरवा सिग्नल मिळाला असून एप्सला कोणताही दिलासा दिला नाही. यानंतर स्टार्टअपला शुल्क भरण्यास सांगण्यात आले, अन्यथा त्यांचे एप काढून टाकले जातील.
कुकू एफएमचे सीईओ लालचंद बिशू यांनी ट्विटरवर पोस्ट करून गुगलवर टीका केली आणि त्याचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं. Naukri.com आणि 99acres चे संस्थापक संजीव बिखचंदानी यांनीही पोस्ट करून गुगलबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, हे एप्स प्ले स्टोअरवर परत कधी येणार? याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही.