नवी दिल्ली - सोशल मीडियाचा वापर हा सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो. प्ले स्टोरवरून विविध अॅप्स हे डाऊनलोड केले जातात. मात्र आता गुगलने काही अॅप्सने दणका दिला आहे. गुगलने प्ले स्टोरवरून 100 हून अधिक पर्सनल लोन देणारे अॅप्स हटवले आहेत. गुगल इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात प्ले स्टोरवरून असे अनेक अॅप्स हटवले आहे. जे युजर्सच्या सेफ्टी पॉलिसीचे उल्लंघन करत होते. हे अॅप्स सेफ्टी पॉलिसीचे उल्लंघन करून ऑनलाईन लोन सर्व्हिस देत असल्याची माहिती मिळत आहे. याआधीही गुगलने धोकादायक असणारे अॅप्स युजर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हटवले आहे.
गुगलने आपल्या एका ब्लॉग पोस्टमधून ही माहिती दिली आहे. सरकार आणि युजर्सकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर गुगलने ही कारवाई केली आहे. गुगलने जवळपास 100 हून जास्त पर्सनल लोन अॅप्सवर कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक युजर्स शॉर्ट टर्म लोन देणाऱ्या कंपन्यांविरोधात तक्रार करीत होते. अनेक कंपन्या लोनसाठी युजर्सला त्रास देत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. तर काही कंपन्या पर्सनल लोन देण्याच्या नावाखाली कॉन्टॅक्ट डिटेल्स अॅक्सेस करीत होती. काहींनी तर वसूली एजन्टकडून धमकावले जात असल्याच्या तक्रारी सुद्धा केल्या होत्या. अशाच वेळी गुगलने हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
फिनटेक एक्सपर्ट श्रीकांत एल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुगलने गेल्या दहा दिवसांत कमीत कमी 118 डिजिटल लोन अॅप्सला हटवले आहे. गुगलने पर्सनल लोन देणाऱ्या असंख्या कंपन्यांना ते कशा पद्धतीने लोकल कायदा आणि रेग्युलेशनला फॉलो करत आहेत याबाबत विचारणा केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुगल प्ले स्टोअरवर वेळोवेळी अनेक अॅप्सला ब्लॉक केले आहे. युजर्सच्या सुविधेसाठी हे पाऊल उचललं आहे. काही दिवसांपूर्वी गुगलने आणखी तीन अॅप्स हटवले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे अॅप्स लहान मुलांची माहिती गोळा करत असल्याचं समोर आलं आहे. मुलाचा डेटा चोरी करीत असल्याचा आरोप या तीन अॅप्सवर करण्यात आला आहे. Princess Salon, Number Coloring आणि Cats & Cosplay ही तीन अॅप्स गुगलने हटवली आहेत.
अलर्ट! Google ने प्ले स्टोअरवरुन हटवले लहान मुलांचा डेटा चोरणारे "हे" Apps
डिजिटल अकाउंटेबिलिटी काउंन्सिलकडून याविषयी चिंता व्यक्त केली जात होती. ही तिन्ही अॅप्स विशेषत: मुलांसाठी तयार करण्यात आली होती. मात्र IDCA ने हे तीन अॅप्स युजर्सचा डेटा कलेक्ट करीत असल्याचं म्हटलं आहे. तसेच हे अॅप्स गुगल प्ले स्टोरवरील नियमांचे उल्लंघन करीत होते. यामध्ये लहान मुलांच्या माहितीचा समावेश होता. व हा डेटा या अॅप कंपन्यांकडून थर्ड पार्टीला दिला जात होता. कंपन्यांकडून सातत्याने होत असल्याचा हा प्रकार आयडीएसीच्या रिसर्च टीमच्या लक्षात आलं. त्यामुळे या टीमने या तीन अॅप्सच्या कृतीबाबत गुगलला माहिती दिली. गुगलने आम्ही रिपोर्टमध्ये सांगितलेले अॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहेत. जेव्हा जेव्हा आम्हाला आमच्या नियमांचं उल्लंघन करणारा अॅप आढळतो तेव्हा आम्ही त्यावर कारवाई करतो. या अॅप्सकडून कुठल्या प्रकारचा डेटा गोळा केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही अॅप्स लहान मुलांकडून वापरली जातात असं म्हटलं आहे.