नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात असून फोनमध्ये विविध अॅप्स असतात. मात्र यातील काही अॅप्स हे युजर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहेत. गुगलने प्ले स्टोरवरून तब्बल 30 लोकप्रिय अॅप्स हटवले आहेत. धोकादायक मेलवेयर मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नवीन युजर्संना प्ले स्टोरवरून डाऊनलोड करता येणार नाही.
गुगलने हटवलेले अॅप्स दोन कोटींहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहेत. त्यामुळे युजर्संनी त्वरीत आपल्या फोनमधून ते डिलीट करावे असा सल्ला दिला जात आहे. WhiteOps च्या सिक्योरिटी रिसर्चर्सने या अॅप्सची माहिती दिली आहे. या अॅप्समध्ये अनेक जाहिराती दाखवल्या जातात. तसेच एकदा डाऊनलोड केल्यावर ते डिलीट करणंही कठीण होऊन बसतं. त्यामुळे गुगलने सांगितलेले 30 अॅप्स फोनमध्ये असल्यास लगेच डिलीट करा.
WhiteOps ने दिलेल्या माहितीनुसार हे अॅप्स खूप जाहिराती दाखवण्यासाठी डिझाईन केलेले आहे. पहिल्यांदा अॅप पब्लिश केल्यानंतर फ्रॉड करणारी मंडळी अकराव्या दिवशी पुन्हा नवीन अॅप पब्लिश करतं. त्यामुळे जास्तीत जास्त अॅप्स प्ले स्टोरवरून हटवण्याआधी 17 दिवसांपर्यंत राहतात. या अॅप्सच्या apk मध्ये पॅकर्सचा वापर करुन त्यातील मेलवेअर्स लपवण्यात आले होते याबाबतही माहिती आता समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
India China Faceoff : "राहुल गांधींनी यामध्ये राजकारण करू नये", जखमी जवानाचे वडील म्हणतात...
Solar Eclipse 2020 : 'कंकणाकृती' सूर्यग्रहण पाहायचंय? मग 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी
इच्छाशक्तीची गरज! भारत चीनला देऊ शकतो तब्बल 17 अब्ज डॉलरचा जबरदस्त झटका
CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्यात 'हे' औषध प्रभावी ठरणार; संक्रमण रोखण्यास मदत करणार
"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?"