स्मार्टफोनमध्ये अनेक उपयुक्त अॅप्स आपण इंस्टाल करतो. यातील अनेक अॅप्स आपल्याला मदत करतात तर काही अॅप्स आपला डेटा चोरी करण्यात व्यस्त असतात. त्याहीपेक्षा धोकादायक अॅप्स पासवर्ड सारखी संवेदनशील माहिती देखील आपल्या स्मार्टफोनमधून चोरी करतात. अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. Google Play Store वरील अश्या 9 अॅप्सची माहिती मिळाली आहे, जे युजर्सचा Facebook युजर्स आयडी आणि पासवर्ड चोरत आहेत. (9 Android apps are stealing Facebook logins and passwords)
या अॅप्सची माहिती Doctor Web या अँटीवायर्स बनवणाऱ्या कंपनीने दिली आहे. हे धोकादायक अॅप्स गुगल प्ले स्टोरवरून 58,56,010 वेळा डाउनलोड करण्यात आले आहेत. Doctor Web यांच्या Malware Analysts च्या माध्यमातून 10 ट्रोजन अॅप्सची माहिती मिळाली होती, यातील 9 अॅप्स गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत. हे अॅप्स निरुपद्रवी वाटतात परंतु स्मार्टफोनमध्ये इंस्टाल केल्यावर हे डेटा चोरी करू लागतात.
हे अॅप्स डाउनलोड केल्यानंतर यातील सर्व फीचर्स वापरता किंवा अॅपमधील जाहिराती बंद करता याव्यात म्हणून युजर्सना फेसबुक अकॉउंटवर लॉगिन करण्यास सांगितले जाते. त्यासाठी फेसबुक लॉगिन सारखे दिसणारे हुबेहूब पेज उपलब्ध होते. त्या नकली फेसबुक लॉगिन पेजच्या माध्यमातून युजर्सनी लॉगिन केली कि युजर्सचा फेसबुक आयडी आणि पासवर्ड हॅकर्सना पाठवला जातो.
डॉक्टर वेबने ही बाब गुगलच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर यातील काही अॅप्स प्ले स्टोरवरून काढून टाकण्यात आले आहेत, परंतु अजूनही काही अॅप्स Google Play Store वर उपलब्ध आहेत. या सर्व अॅप्सची माहिती आम्ही पुढे दिली आहे.
Facebook पासवर्ड चोरणारे 9 अँड्रॉइड अॅप्स
- Processing Photo - फोटो एडिटिंग अॅप - 5,00,000 पेक्षा जास्त डाउनलोडस
- PIP Photo - फोटो एडिटिंग अॅप - 50,00,000 पेक्षा जास्त डाउनलोडस
- App Lock Keep - फोन लॉक अॅप - 50,000 - पेक्षा जास्त डाउनलोडस
- App Lock Manager - फोन लॉक अॅप - 10,000 - पेक्षा जास्त डाउनलोडस
- Lockit Master - 5,000 - फोन लॉक अॅप - पेक्षा जास्त डाउनलोडस
- Horoscope Daily - अॅस्ट्रोलॉजी अॅप - 100,000 पेक्षा जास्त डाउनलोडस
- Horoscope Pi - अॅस्ट्रोलॉजी अॅप - 1,000 पेक्षा जास्त डाउनलोडस
- Inwell Fitness - फिटनेस प्रोग्राम अॅप - 100,000 पेक्षा जास्त डाउनलोडस
- Rubbish Cleaner - क्लिनर अॅप - 1,000 पेक्षा जास्त डाउनलोडस