नवी दिल्ली - रेल्वे स्थानकांवरील फुकट वायफाय आता बंद झाले आहे. गुगलकडूनरेल्वे स्थानकावर देण्यात येणारी मोफत वायफाय सेवा म्हणजेच गुगलचं स्टेशन आता बंद होणार आहे. गुगलने प्रवाशांच्या सोयीसाठी पाच वर्षांपूर्वी 2015 मध्ये गुगलने भारतीय रेल्वे आणि रेलटेल यांच्यासमवेत मोफत सार्वजनिक वायफाय सेवा देणारी 'स्टेशन' ही सेवा सुरू केली होती. देशात आपली ऑनलाईन ओळख निर्माण करणे सोपे झाले असून इंटरनेटही स्वस्त झाले आहे. त्यामुळे आता 'स्टेशन' सेवेची आवश्यकता उरली नसल्याचं कारण गुगलने दिले आहे.
2020 पर्यंत देशातील 400 रेल्वे स्टेशन्सवर वायफाय सेवा उपलब्ध करण्याचे गुगलचे उद्दिष्ट होते. मात्र हा आकडा 2018 मध्येच पार केल्याची माहिती गुगलचे विभागीय उपाध्यक्ष सीझर सेनगुप्ता यांनी दिली आहे. गुगलने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी भारतीय रेल्वे व रेलटेल यांच्या भागीदारीतून बाहेर पडण्यासाठी गुगलने आता हालचाली सुरू केल्या आहेत. ही सेवा सुरू ठेवण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. वाढत्या तांत्रिक गरजा, पायाभूत सुविधा पुरवणे आमच्या भागीदारांना शक्य होत नसल्याचे गुगलचे म्हणणं आहे.
'या' बातम्या ही नक्की वाचा
आता स्मार्टफोन राहणार थंडा थंडा कूल कूल, शाओमीचा नवा पंखा पॉवरफूल
आता Google वरून करा फोनचा रिचार्ज ; कसं ते जाणून घ्या
अवघ्या 10 सेकंदात अनलॉक करा स्मार्टफोन, फॉलो करा सोप्या स्टेप्स...
इंटरनेट असुरक्षिततेमुळे जागतिक स्तरावर वाढले हॅकिंग
WhatsApp ला हॅकिंगचा धोका; त्वरित अॅक्टिव्हेट करा 'हे' सिक्यॉरिटी फीचर्स
महत्त्वाच्या बातम्या
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याचे आदेश
राजस्थानमध्ये 85 मोरांचा संशयास्पद मृत्यू, पक्षीमित्रांकडून हळहळ
China Coronavirus : धक्कादायक! चीनच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती?
१२वीची परीक्षा आजपासून; विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट
एसआयटी चौकशीसाठी कायदेविषयक सल्ला घेणार