गुगलने आपल्या ऑनलाईन मीटिंग अॅप Google Meet च्या अँड्रॉइड युजर्ससाठी अॅनिमेटेड व्हिडीओ बॅकग्राउंड फीचर रोल आउट करण्यास सुरवात केली आहे. हे फिचर याआधी फक्त आयओएस आणि डेस्कटॉप युजर्ससाठी उपलब्ध होते. या फिचरच्या मदतीने आता अँड्रॉइड फोनवर गुगल मीट वापरताना अॅनिमेटेड व्हिडीओचा वापर बॅकग्राउंड म्हणून करता येईल.
Animated Background
Google Meet च्या नव्या फीचरच्या मदतीने युजर्स व्हिडीओ कॉल दरम्यान गुगलने बनवलेल्या 6 व्हिडीओजचा वापर बॅकग्राऊंड म्हणून करू शकतात. ऑफिस मीटिंग आणि ऑनलाईन क्लासमध्ये आपले बॅकग्राऊंड हटके असावे असे प्रत्येकाला वाटते. ही गरज कंपनीने ओळखून अॅनिमेटेड बॅकग्राऊंडचे फिचर सादर केले होते. हे फिचर याआधी इतर प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होते आणि आता गुगलने हे फिचर अँड्रॉइडसाठी सादर केले आहे. अॅनिमेटेड बॅकग्राऊंड फिचर येत्या दोन आठवड्यात सर्व अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध होईल.
Live translation
अॅनिमेटेड व्हिडीओ बॅकग्राउंड फीचर व्यतिरिक्त कंपनीने या आठवड्यात आणखीन एक अपडेट जारी केला आहे. कंपनीने Google Meet साठी लाईव्ह ट्रान्सलेटेड कॅप्शन फीचरचे बीटा व्हर्जन सादर केले आहे. सुरवातीला या फिचरमधून इंग्रजी मीटिंग स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तुगीज आणि जर्मनमध्ये ट्रान्सलेट केली जाईल. या फिचरमुळे जगभरातील युजर्सना एकमेकांची भाषा लाईव्ह मिटिंगमध्ये समजेल.