Google च्या Play Store स्टोर पॉलिसीमध्ये उद्यापासून म्हणजेच ११ मे पासून काही बदल होणार आहे. यामधील एक बदल म्हणजे कॉल रेकॉर्डिंग अॅप्स बंद होणार आहेत. याचाच अर्थ तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग अॅपचा वापर करून कॉल रेकॉर्ड करता येणार नाहीत.
कंपनीनं यापूर्वीच यासंदर्भातील माहिती दिली होती. सुरक्षेच्या कारणास्तव कॉल रेकॉर्डिंग अॅप्स बंद केली जाणार आहेत. कॉल रेकॉर्डिंग अॅप्स अनेक प्रकारच्या परवानग्या घेतात. त्याचा अनेक डेव्हलपर्स चुकीचा फायदा घेतात, असं कंपनीनं म्हटलंय.
याशिवाय कॉल रेकॉर्डिंग अॅप्सबाबत निरनिराळ्या देशांमध्ये निरनिराळे कायदे आहेत. यामुळे कंपनी यात बदल करत आहेत. गुगलच्या नव्या पॉलिसीप्रमाणे कॉल रेकॉर्डिंग्स उद्यापासून बंद होतील. या पॉलिसीमुळे ट्रूकॉलरच्या माध्यमातूनही रेकॉर्डिंग करता येणार नाही.
इनबिल्ट रेकॉर्डिंग अॅप्स सुरू राहणारज्या स्मार्टफोन्समध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग अॅप्स देण्यात आली आहेत, ती मात्र काम करत राहणार आहेत. जर तुमच्या मोबाइलमध्ये पहिल्यापासून ही अॅप्स आहेत त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाही. ज्यांच्या मोबाइलमध्ये मात्र ही इनबिल्ट सेवा उपलब्ध नाही, त्या युझर्सना मात्र समस्या येणार आहेत. नव्या पॉलिसीपूर्वीही कंपनीनं हे प्रयत्न केले होते. Android 10 मध्ये रेकॉर्डिंग डिफॉल्ट बंद ठेवण्यात आलं होतं. ते हटवण्यासाठई अॅप्सनं Accessibility API चा वापर करण्यास सुरूवात केली होती. आता गुगलच्या या पॉलिसीनंतर हेदेखील शक्य नाही.