नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची स्थिती कायम आहे. भारतात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी अद्याप भीती कायम आहे. त्यामुळे टेक्नोलॉजीची दिग्गज कंपनी गुगलने वर्क फ्रॉम होमचा कालावधी सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवला आहे.
गुगलचे जवळपास २,००,००० कर्मचारी आता सप्टेंबर २०२१ पर्यंत आपल्या घरून काम करू शकणार आहेत. यानंतर ज्यावेळी ऑफिस उघडले जाईल, त्यावेळी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ तीन दिवस कार्यालयात यावे लागणार आहे. बाकीची तीन दिवस पुन्हा वर्क फ्रॉमची सुविधा देण्यात आली आहे.
रिपोर्टच्या माहितीनुसार, अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवला आहे. त्यात म्हटले आहे की, कंपनी फुल हायब्रिड वर्क फोर्स मॉडलचा अवलंब करीत आहे. यासाठी प्रयोग केले जात आहे. कारण, प्रोडक्टिविटीवरून कोणतीही समस्या उद्धवू नये. गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना २०२१ च्या दुसऱ्या सहामाही मध्ये करोना लस सुद्धा देणार आहे.
ट्विटरचे कर्मचारी निवृत्तीपर्यंत करू शकणार घरातून कामया वर्षीच्या मे महिन्यात गुगलने म्हटले होते की, त्यांचे दोन कर्मचारी घरून काम करू शकते. त्यांना ऑफिसमध्ये बोलावण्यासाठी दबाव टाकला जाणार नाही. तर ट्विटर ने म्हटले की, त्यांचे कर्मचारी रिटारयरमेंट पर्यंत घरून काम करू शकतील. फेसबुककडून रिमोट वर्क प्लान लागू करण्यात आला आहे. फेसबुकचे जवळपास निम्मे कर्मचारी २०३० पर्यंत घरून काम करू शकतील.