शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून लोकप्रिय पेमेंट अॅप पेटीएम हटवल्यानं मोठी खळबळ उडाली होती. काही तासांनंतर ते ऍप पूर्ववत झाले. परंतु पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी अमेरिकन दिग्गज टेक कंपनी गुगलच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आहेत. Googleने त्यांच्या पेमेंट व्यवसाय विस्तारित करण्यासाठी अधिकारांचा दुरुपयोग केला आहे आणि ग्राहकांना आकर्षित करण्याचा हा अयशस्वी प्रयत्न असल्याचंही विजय शेखर शर्मा यांनी सांगितलं आहे. शर्मा म्हणाले की, त्यांच्या कंपनीने काहीही चुकीचं केलेलं नाही. पेटीएमच्या 30 कोटींहून अधिक ग्राहकांना त्यांनी भरवसा दिला की, त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. नोटीस देण्यापूर्वी गूगलने पेटीएमवर एकतर्फी कारवाई केली, असा दावा त्यांनी केला. या संपूर्ण कारवाईमध्ये Google स्वतः न्यायाधीश आणि फाशी देणारा, लाभार्थी होता.गुगलनं त्यांच्या फायदासाठी केले हे काम शर्मा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, 'त्यांच्याकडे ताकद आणि अधिकार आहेत. ते नक्कीच आम्हाला त्रास देऊ शकतात. गुगलने पेटीएमला नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखण्यासाठी हे केले असावे, जेणेकरून इतर पेमेंट अॅपला त्याचा फायदा होईल. यात Googleच्या स्वतःच्या अॅपचा समावेश आहे. त्यांनी गुगलवर स्वत: च्या फायद्यासाठी काम केल्याचा आरोप केला. गुगलने असा युक्तिवाद केला होता की, कसिनो/जुगारसारखे खेळ पेटीएमच्या माध्यमातून खेळले जात असल्यानेच प्ले स्टोअरमधून पेटीएम हटवलं. परंतु शर्मा यांनी तो दावा खोडून काढला आहे. पेटीएम अॅपने काहीही चुकीचे केलेले नाही. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमद्वारे देशातील 97 टक्के स्मार्टफोन इकोसिस्टमवर गुगलचं प्रभुत्व आहे. गुगल आपल्या शक्तीचा आणि अधिकाराचा गैरवापर करीत आहे का, असे विचारले असता शर्मा म्हणाले हो तो गैरवापर करीत आहे. भारताचे कायदे गुगलवर लागू होत नाहीत, ते स्वतःच्या धोरणावर चालतात.पेटीएममध्ये चीनचा अलिबाबा ग्रुप हा सर्वात मोठा भागधारक आहे. शर्मा म्हणाले की, सरकार स्वावलंबी भारतावर भर देत आहे आणि कोणत्याही परदेशी कंपनीवर घरगुती व्यवसायावर परिणाम होत नाही हे पाहिले पाहिजे. 'जेव्हा आपण स्वावलंबी भारताबद्दल बोलत आहोत, तेव्हा आपण असा विचार केला पाहिजे की, भारतीय कंपन्या भारतीय कायद्यानुसार चालतील. जेणेकरून दुसर्या देशाची धोरणे आपल्याला चालवणार नाहीत. अमेरिकन सामर्थ्यवान कंपन्या आम्हाला त्यांच्या मार्गाने चालवू शकत नसल्याचंही विजय शेखर शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे.
आम्ही आमच्या धोरणांवर चालणार, अमेरिकेच्या नाही; पेटीएम फाऊंडरचे खडे बोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 10:40 AM