भारतात 5G कनेक्टिव्हिटी हा सेलिंग पॉईंट बनला आहे. अनेकजण फक्त 5G स्मार्टफोन हवा असा आग्रह धरत आहेत. स्मार्टफोन कंपन्यांनी देखील 4G स्मार्टफोन लाँच करणं कमी केलं आहे. विविध भाज्यांमध्ये जसा बटाटा सामावून जातो तशी 5G कनेक्टव्हिटी जवळपास सर्वच नवीन स्मार्टफोन्समध्ये दिसत आहे. परंतु हे फोन्स निकामी ठरू शकतात कारण भारतात विकल्या जाणाऱ्या 5G स्मार्टफोन्सच्या वापरासाठी टेस्टिंगनंतर सर्टिफिकेट जारी करण्याची योजना सरकार बनवत आहे.
लोकल टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन
देशात विकल्या जाणाऱ्या सर्व 5G डिवाइसेजची लोकल टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन करण्याची घोषणा सरकारनं केली आहे, अशी बातमी मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी आधीच विकत घेतलेल्या स्मार्टफोन्सना ही कनेक्टिव्हिटी मिळणार कि नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. टेस्टिंगमध्ये फेल झालेल्या डिवाइसचं काय होणार, हे स्पष्ट झालं अजून नाही.
टेलिकॉम इंजीनियरिंग सेंटर (TEC) च्या एका बैठकीत 5G डिवाइसची अनिवार्ट टेस्टिंग आणि सर्टिफिकशन ऑफ टेलिकॉम इक्विपमेंट (MTCTE) करण्यावर चर्चा झाली आहे. TEC ही दूरसंचार विभागाचा एक विंग आहे. त्यामुळे 5G असलेल्या स्मार्टफोन, स्मार्ट वॉच, वियरेबल स्मार्ट कॅमेरा आणि अन्य डिवाइसची टेस्टिंग आणि सर्टिफिकेशननंतर विक्री करता येईल. ही योजना 1 जानेवारी 2023 पासून सुरु केली जाऊ शकते. सरकार फक्त स्मार्टफोन्सची ग्रेडिंग करू शकतं अशी देखील चर्चा आहे. तसेच ग्राहकांच्या सुरक्षेसाठी देखील टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन केलं जाऊ शकतं.