शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

Twitter व्हेरिफिकेशन : 661 नव्हे तर 780 रुपये मोजावे लागतील, सरकारला द्यावा लागेल 18 टक्के जीएसटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 2:53 PM

Twitter : सर्व प्रकारच्या आयटी सॉफ्टवेअर पुरवठ्यासाठी जीएसटी दर 18 टक्के आहे. 

नवी दिल्ली : ट्विटर (Twitter) व्हेरिफिकेशनची समस्या सातत्याने वाढत आहे. यापूर्वी, इलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्पष्ट केले आहे की, आता युजर्संना व्हेरिफिकेशनसाठी 8 डॉलर इतके चार्ज द्यावे लागेल. पण, ही बाब एवढ्यावरच थांबत नाही, तर इलॉन मस्क यांना महिन्याला 8 डॉलर म्हणजेच जवळपास 661 रुपये चार्ज दिल्यानंतर युजर्सला त्यावर 18 टक्के जीएसटीही (GST) भरावा लागणार आहे. दरम्यान, जीएसटी दर आयटी सेवांसाठी (सॉफ्टवेअर) निश्चित केला आहे. सर्व प्रकारच्या आयटी सॉफ्टवेअर पुरवठ्यासाठी जीएसटी दर 18 टक्के आहे. 

ट्विटरच्या अधिग्रहणानंतर, इलॉन मस्क यांनी दरमहा 8 डॉलर दरमहा व्हेरिफिकेशन चार्ज आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भारतात हे चार्ज थोडे कमी होण्याची शक्यता आहे. इलॉन मस्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध देशांतील उत्पन्नानुसार चार्ज निश्चित केले जातील. पुढील आठवड्यात चार्ज वसुली सुरू होऊ शकते. यामुळे, लोकांना ट्रोल आणि स्पॅमपासून सुटका मिळेल आणि ब्लू टिक (Blue Tick) असलेल्या लोकांना सर्च, रिप्लाय आणि मेंशनमध्ये प्राधान्य मिळेल, तसेच त्यांना व्हिडिओ आणि ऑडिओ पोस्ट करण्याची परवानगी मिळू शकते. भारतात हे चार्ज 200 ते 250 रुपये प्रति महिना असू शकते.

दरम्यान, भारतात अडीच कोटी युजर्स ट्विटर प्लॅटफॉर्म वापरतात. ट्विटरसाठी भारत ही तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. ट्विटर आपल्या व्हेरिफिकेशन प्रोसेस दरम्यान कोणत्याही युजर्सचे अकाउंट व्हेरिफिकेशन करते आणि यासाठी आता लोकांना कदाचित पैसे द्यावे लागतील. सध्या ही सुविधा फक्त ऐच्छिक आहे आणि जर तुम्ही स्वतः ती मागितली असेल, तर एका प्रक्रियेनंतर तुमचे अकाउंट व्हेरिफाय केले जाते आणि तुमच्या नावासमोर एक ब्लू टिक दिसून येते.

नेत्यांना विशेष टॅग देणारआता ट्विटर नेत्यांना आणि सेलिब्रिटींना सेकंडरी टॅग देणार असल्याची घोषणा इलॉन मस्क यांनी केली. मस्क यांनी ज्या सेकंडरी टॅगची घोषणा केली, तो टॅग अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांना देण्यात आला आहे. बायडन यांच्या नावाखाली United States Government Official असा सेकंडरी टॅग आहे. पण, हा टॅग भारतातील नेत्यांना अजुनही देण्यात आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) किंवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावासमोर असा सेकंडरी टॅग दिसत नाही. पण, आता ट्विटरला ब्लू टिक चार्ज दिल्यानंतर त्यात बदल दिसतील, अशी शक्यता आहे.

54 हजार भारतीयांचे अकाउंट्स बॅन...आता ट्विटरने हजारो भारतीयांवर कारवाई करत देशातील 52,141 युजर्सचे अकाउंट्स बॅन केले आहेत. दर महिन्याप्रमाणे ट्विटरने आपला मंथली रिपोर्ट सादर केला, यात ही माहिती समोर आली आहे. हे अकाउंट्स 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबरदरम्यान बंद केले आहेत. हे अकाउंट्स बाल लैंगिक शोषण, नग्नता आणि याप्रकारच्या कंटेंटला शेअर केल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. इलॉन मस्क आल्यानंतर ट्विटरने 1982 अकाउंट्सना दहशतवाद पसरवण्याच्या आरोपाखाली बॅन केले आहे.

टॅग्स :Twitterट्विटरelon muskएलन रीव्ह मस्कtechnologyतंत्रज्ञान