शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
5
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
6
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
7
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
8
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
10
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
11
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
12
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
13
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
14
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
15
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
16
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
17
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
18
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
19
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
20
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली

सावधान! जवान आणि अधिकारी निशाण्यावर, हॅकर्सने बनवला धोकादायक Malware; 'असं' करतो काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 7:37 PM

जवान आणि अधिकाऱ्यांना टार्गेट करणाऱ्या हॅकर्सच्या ग्रुपने CapraRAT नावाचा एक मालवेयर तयार केला आहे.

नवी दिल्ली - देशाचे जवान आणि अधिकाऱ्यांना निशाणा बनवणाऱ्या एका नवीन हँकिंग सॉफ्टवेअरचा खुलासा झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, भारतीय सैन्याचे जवान आणि अधिकाऱ्यांना टार्गेट करणाऱ्या हॅकर्सच्या ग्रुपने CapraRAT नावाचा एक मालवेयर तयार केला आहे. या मालवेयरच्या मदतीने अँड्राईड डिव्हाईसला हॅक करणे शक्य आहे. हा एक Remote Access Trojan (RAT) असून, जो यूजर्सचे लोकेशन, कॉन्टॅक्ट नंबर आणि कॉल हिस्ट्रीसह खासगी माहिती चोरी करू शकतो. 

हॅकिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने हॅकर्स युजर्सच्या फोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोनला देखील एक्सेस करू शकतात. याच्या मदतीने खासगी माहिती चोरी केली जाऊ शकते. नवीन हॅकिंग टूलचा शोध सायबर सिक्योरिटी फर्म Trend Micro ने लावला आहे. त्यांनी जानेवारी 2020 ते सप्टेंबर 2021 पर्यंतच्या डेटाच्या आधारावर ही माहिती दिली. फर्मने सांगितले की, APT36 हे CapraRAT ला वापरताना आढळले. या ग्रुपला Earth Karkaddan, Operation C-Major, PROJECTM, Mythic Leopard आणि Transparent Tribe च्या नावाने देखील ओळखले जाते. 

रिपोर्टनुसार, CapraRAT जवळपास Crimson RAT सारखा आहे, ज्याचा वापर APT36 विंडोज डिव्हाइसला टार्गेट करण्यासाठी केला जातो. दोन्ही मॅलवेयरच्या डिझाईनमध्ये खूप समानता आहे. Crimson RAT प्रमाणेच या मॅलवेयरला देखील टार्गेट यूजरच्या डिव्हाइसमध्ये शिरकाव करण्यासाठी फिशिंग लिंकची मदत घ्यावी लागते. दोन्ही मॅलवेयरमध्ये फंक्शन नेम, कमांड्ससह अनेक गोष्टी समान आहेत. याच कारणामुळे फर्म याला Crimson RAT चे मॉडिफाइड व्हर्जन असल्याचे सांगत आहे. 

रिपोर्टनुसार, या मालवेयरला टार्गेट फोनपर्यंत पोहचण्यासाठी बनावट सरकारी कागदपत्रं, हनीट्रॅप अथवा कोरोनाशी संबंधित माहितीचे स्वरुप दिले जाऊ शकते. डाऊनलोड झाल्यानंतर हे इतर ‍एप्सप्रमाणे सिस्टम परमिशन मागतं. त्यानंतर हे सॉफ्टवेअर युजर्सची खासगी माहिती चोरी करू शकतं. या मालवेयरच्या मदतीने हॅकर्स युजर्सच्या फोनचे लोकेशन, कॉल हिस्ट्री, मायक्रोफोनचा एक्सेस आणि ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान