नवी दिल्ली : Facebook यूजर्स डेटा लिक झाल्यापासून सोशल मीडिया कंपनी सध्या अनेकांच्या रडारवर आहेत. फेसबुकवरुन ५ कोटी यूजर्सची माहिती लिक होण्याची घटना ताजी असतानाच आता गुरुवारी एका यूजरने फेसबुकवरुन एका वेगळ्याच प्रकारे फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे.
यूजरने तक्रार केली आहे की, फेसबुकवर त्यांच्या नावाने फेक अकाऊंट तयार करुन त्यांच्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून पैशांची मागणी केली जात आहे. याआधीही फेसबुकवरुन अशाप्रकारे पैशांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
मास्टर शेफ ऑफ इंडिया या कार्यक्रमाचा होस्ट आणि मॅसिव्ह रेस्टॉरंटचे फाऊंडर जोरावर कालरा याने आपल्या अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने सांगितले की, त्याच्या नावाचं एक फेक अकाऊंट तयार करुन त्यांच्या मित्रांना मेसेज केलेत. त्यासोबतच यूजर्सने ही तक्रार केली की, 'फेसबुक'ने त्यांना व्हॉट्सअॅपवर नोटिफिकेशन पाठवून आपल्या प्रोफाईल पासवर्ड बदलण्यास सांगितले.
याआधीही अशाप्रकारची प्रकरणे बघायला मिलाळीत. ज्यात हॅकर्सनी यूजरचं अकाऊंड हॅक करुन त्यांच्या मित्रांना मेसेज पाठवून पैसे मागितले होते. देशाची राजधानी दिल्लीमध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.
कशी घ्याल काळजी?
1) जर अशाप्रकारे तुमचा एखादा मित्र तुम्हाला मेसेज करुन पैसे मागत असेल तर आधी त्याला कॉल करुन खात्री करुन घ्या. जोपर्यंत योग्य ती माहिती तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत भावनिक होऊन मदत करु नका.
२) तुम्ही वर्षांनी कसे दिसाल, असे सांगणाऱ्या वेबसाईट लिंकवर चुकूनही क्लिक करु नका. अशा अॅप्स किंवा वेबसाईटपासून नेहमी दूर रहायला हवे.
३) फेसबुकसोबतच व्हॉट्सअॅपवरही फसवणूकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. कधीही व्हॉट्सअॅप मेसेजवर आलेल्या लिंकवर अनोळखी लिंकवर क्लिक करु नका. अशा लिंकवर क्लिक केल्यास नवीन पेज ओपन होतं आणि तुमची माहिती मागितली जाते. असे केल्यास तुमची खाजगी माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते आणि तुमची फसवणूक होऊ शकते.