शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

सावधान! बँकेशी लिंक आहे आधार कार्ड?; हॅकर्स बायोमॅट्रिकने झटक्यात रिकामं करतात अकाऊंट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 3:23 PM

आधार कार्डच्या माध्यमातून माहिती चोरून फसवणुकीचा हा नवा प्रकार घडला आहे. ही घटना पाहून सायबर एक्सपर्टही हैराण झाले आहेत.

हॅकर्स एखाद्याचा मोबाईल हॅक करतात आणि त्यांचे पैसे बँकांमधून काढून घेतात. काहीवेळा, हॅकर्स अनधिकृत वेबसाइटवरून माहिती चोरतात आणि एखाद्याच्या बँक खात्याला लक्ष्य करतात. अनेक वेळा ते OTP, पेमेंट किंवा QR कोडच्या माध्यमातून लोकांना फसवतात. पण आता फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  OTP किंवा वैयक्तिक माहिती शेअर केलेली नसतानाही खात्यातून सर्व पैसे गायब झाले आहेत.

आधार कार्डच्या माध्यमातून माहिती चोरून फसवणुकीचा हा नवा प्रकार घडला आहे. ही घटना पाहून सायबर एक्सपर्टही हैराण झाले आहेत. हॅकरने प्रथम एका महिलेच्या नावावर असलेल्या घराच्या रजिस्ट्री रेकॉर्डमधून अंगठा आणि बोटांचे ठसे चोरले आणि नंतर त्यांचे संपूर्ण बँक खाते रिकामे करण्यासाठी त्या बायोमेट्रिक्सचा वापर केला. हे प्रकरण ऐकल्यावर अशक्य वाटत असले तरी प्रसिद्ध यूट्यूबर पुष्पेंद्र सिंह याच्या आईसोबतही असेच घडले. त्याच्या यूट्यूब आणि ट्विटर चॅनेलवर, पुष्पेंद्र लोकांना पर्सनल फायनान्स आणि सायबर क्राइमबद्दल सल्ला देतो.

ही संपूर्ण घटना पुष्पेंद्रने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. गेल्या महिन्यात पुष्पेंद्र फरिदाबाद येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत आईच्या पासबुकमध्ये नोंद करण्यासाठी गेला होता. पण एंट्री केल्यानंतर जे समोर आले त्यामुळे त्याला धक्काच बसला. खात्यात शून्य रक्कम होती. त्याने बँकेच्या मॅनेजरला घटनेची माहिती दिली. पुष्पेंद्रला धक्काच बसला, त्याने ताबडतोब आईला फोन करून सांगितले की खात्यात एक रुपयाही नाही.

आई म्हणाली की तिने कधीच पैसे काढले नाहीत, मग तिचे खाते कसे रिकामे असेल? पुष्पेंद्र आपल्या घरी परतला आणि आईसोबत बँकेत गेला आणि पुन्हा बँक मॅनेजरला हा धक्कादायक प्रकार सांगितला. तपासात असे आढळून आले की बिहारमधील एका व्यक्तीने आधार कार्ड डेटावरून घेतलेल्या फिंगरप्रिंटचा वापर करून खात्यातून पैसे काढले होते.

पुष्पेंद्र अजूनही शॉकमध्येच होता कारण त्याने मॅनेजरला सांगितले की त्याच्या आईने कोणताही OTP किंवा आधार कार्ड तपशील कोणाशीही शेअर केला नाही. संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतर, बँक मॅनेजरने उघड केले की ही काही पहिलीच घटना नाही, अशाच प्रकारच्या इतर अनेक प्रकरणे आहेत ज्यात हॅकर्सनी प्लॉट/फ्लॅट रजिस्ट्री रेकॉर्डमधून फिंगरप्रिंट्स कॉपी/क्लोन केले आणि बायोमेट्रिक तपशील वापरून अशा घटना घडवून आणल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :bankबँकMONEYपैसाCrime Newsगुन्हेगारी