लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इंटरनेट असुरक्षिततेमुळे जगभरात हॅकिंगमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण गुगल इंडिया ट्रस्ट अॅण्ड सेफ्टी विभागाचे संचालक सैकत मित्रा यांनी सांगितले. मागील काही वर्षांत इंटरनेटची उपलब्धता झपाट्याने वाढली आहे; मात्र इंटरनेट साक्षरता नसल्यामुळे हॅकिंगचे प्रमाण वाढल्याचेही सैकत यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर ‘सेफर इंटरनेट डे’च्या निमित्ताने गुगल इंडियाच्या वतीने ‘पहले सेफ्टी’ अभियानाच्या माध्यमातून नेटीझन्सना इंटरनेट सुरक्षेविषयी साक्षर करण्यात येणार आहे.
गुगल इंडियाचे सैकत मित्रा यांनी सांगितले, आजच्या काळात इंटरनेट साक्षरता खूप महत्त्वाची आहे. सध्या आॅनलाइन पेमेंट, आॅनलाइन बँकिंग खूप सहज हाताळले जाते; मात्र त्यामागील सुरक्षितता पडताळली जात नाही. या कारणामुळे सहज हॅकिंग, पैशांची फसवणूक केली जाते. हे गैरप्रकार टाळण्यासाठी गुगलने खास अभियान हाती घेतले असून डेटा सिक्युरिटी काऊन्सिल आॅफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने काम करणार आहे.
याशिवाय, काही खासगी संस्था आणि कंपन्यांसोबतही या अभियानाच्या माध्यमातून युझर्सना ुंइंटरनेट सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल.हॅकिंग व फसवणुकीचा धोका ओळखून गुगलने स्वत: पुढाकार घेऊन इंटरनेटवरून काही साइट्स ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अशी चुकीची किंवा खोटी संकेतस्थळे, अॅप्स गुगलवर थेट सुरूच होणार नाहीत याची काळजी आम्ही घेत आहोत, असे मित्रा यांनी सांगितले. तर डेटा सिक्युरिटी काउन्सिल आॅफ इंडियाच्या अमित घोष यांनी सांगितले, डिजिटल पेमेंट अभियान सात भाषांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यामुळे देशाच्या खेड्यापाड्यांत जिथे इंटरनेट उपलब्धता वेगाने वाढतेय, तिथे साक्षरताही वाढावी असा प्रयत्न आहे.पासवर्ड स्ट्राँग करणे गरजेचेइंटरनेट साक्षरतेसाठी अगदी सोशल मीडियाच्या अकाउंट पासवर्डपासून ते अगदी आॅनलाइन पेमेंटसाठी वापरण्यात येणारे पासवर्ड स्ट्राँग करण्याचा सल्ला गुगल इंडियाच्या तज्ज्ञांनी दिला. शिवाय, फोन्समध्ये सेव्ह करण्यात येणारे इमर्जन्सी संपर्कही ‘आॅनर इर्न्फोमेशन’ या विभागात फीड केल्यास त्याचा आपत्कालीन परिस्थितीत वापर होऊ शकतो, असे ते म्हणाले. आपल्या सर्व सोशल मीडियाचे स्रं२२६ङ्म१.िॅङ्मङ्मॅ’ी.ूङ्मे या संकेतस्थळावर पडताळूनही पाहता येतील. तसेच सोशल मीडियावर बऱ्याच वर्षांपासून असणारे पासवर्ड काही वर्र्षांनंतर बदलावेत; त्यामुळे इंटरनेटची असुरक्षितता टाळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.