व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे खूप लोकप्रिय चॅटिंग अॅप आहे. अनेक जण व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. यात फीचर ब्लॉक देखील आहे. एखाद्याला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्यास, तो तुम्हाला या मेसेजिंग अॅपवर मेसेज किंवा कॉल करू शकत नाही. जर तुम्हाला कोणी ब्लॉक केले असेल तर तुम्ही समोरच्या युजरचे लास्ट सीन स्टेटस पाहू शकणार नाही. मात्र, काहीवेळा प्रायव्हसी सेटिंगमुळे देखील ते दिसत नाही. जर तुम्हाला कॉन्टॅक्टचे नवीन प्रोफाइल फोटो दिसत नसल्यास, याचा अर्थ तुम्हाला ब्लॉक केले आहे. मात्र एका सोप्या ट्रिकने तुम्ही त्यांना व्हॉट्सअॅपवर पुन्हा मेसेज करु शकतात. या ट्रिक्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
असा करा अनब्लॉक-
- सर्वात प्रथम फोनमध्ये WhatsApp उघडा.
- आता सेटिंग्समध्ये जा.
- येथे अकाउंट डिलीटचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- पुढे तुमचा फोन नंबर टाकून डिलीट माय अकाउंटवर क्लिक करा.
- या प्रोसेसनंतर तुमचे WhatsApp अकाउंट डिलीट होईल.
- आता WhatsApp ला पुन्हा इंस्टॉल करून अकाउंट क्रिएट करा.
- त्यानंतर तुम्ही ज्या यूजरने तुम्हाला ब्लॉक केले आहे, त्याला मेसेज पाठवू शकता.
- मात्र, लक्षात ठेवा की WhatsApp अकाउंट डिलीट केल्यास तुम्ही सर्व ग्रुपमधून बाहेर व्हाल. तसेच, तुमचे जुने चॅट देखील डिलीट होईल. तुम्हाला पुन्हा त्या ग्रुपमध्ये सहभागी व्हावे लागेल.
- तुम्हाला ब्लॉक करणाऱ्या यूजरला मेसेज सेंड करण्यासाठी इतर मित्र किंवा कुटुंबातील सदस्याच्या मदतीने एक WhatsApp ग्रुप तयार करा.
- या ग्रुपमध्ये ज्या यूजरने ब्लॉक केले आहे, त्याला देखील अॅड करा.
- ग्रुप तयार केल्यानंतर इतर मित्र अथवा कुटुंबातील सदस्याला तो ग्रुप सोडण्यास सांगा.
- यानंतर केवळ तुम्ही व ब्लॉक केलेली व्यक्ती त्या ग्रुपमध्ये असेल.
- आता तुम्ही थेट ग्रुपवर मेसेज करून त्या यूजरशी बोलू शकता.
- WhatsApp आणतंय खास नवं फीचर-
WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत लोकप्रिय माध्यम आहे. मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. WhatsApp ही आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर करण्यासाठी नवनवीन फीचर्स हे सातत्याने आणत असतं. काही दिवसांपूर्वी WhatsApp ने कॉन्टॅक्ट सेक्शनच्या इंटरफेसला बदलले आहे. सध्या हे फीचर अँड्राइड बीटा व्हर्जन वापरणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध आहे. या फीचरला Frequently contacted आणि Recent chats अशा दोन भागात विभागले आहे.
वारंवार ज्या युजर्सशी चॅट करता, ते युजर्स Frequently contacted मध्ये दिसतात. तर नुकतेच ज्या युजर्सशी चॅट केले आहे ते Recent chats मध्ये दिसतात. परंतु. युजर्सला नवीन बदल आवडलेले नाहीत. कंपनी पुन्हा जुनी कॉन्टॅक्ट लिस्ट आणण्याची शक्यता आहे. WhatsApp ने गुगल प्ले बीटा प्रोग्रामच्या माध्यमातून अँड्राईड यूजर्ससाठी एक नवीन अपडेट रोलआउट करण्यास सुरू केले आहे. हे अपडेट अॅप व्हर्जन 2.22.5.9 पर्यंत दिले आहे. रिपोर्टनुसार, युजर्सच्या बॅकलॅशनंतर WhatsApp आता जुन्या इंटरफेसला रिस्टोर करत आहे. आयओएस आणि अँड्राईड युजर्सला बीटा अपडेटमध्ये डिझाइनमध्ये झालेला बदल आधीच पाहायला मिळत आहे. याशिवाय कंपनी ग्रुप कॉल दरम्यान सर्व युजर्ससाठी वॉइस वेवफॉर्म देखील उपलब्ध करत आहे. वॉइस वेवफॉर्म हे वॉइस नोट्समध्ये ज्याप्रमाणे दिसतात, तसे असतील.