म्युजिक ऐकण्यासाठी, मुव्हीज बघण्यासाठी आणि व्हिडीओ कॉल, तसेच कॉलिंगसाठी हेडफोन्स खूप उपयुक्त ठरतात. सध्या बाजारात अनेक हेडफोन्स उपलब्ध आहेत त्यामुळे कोणाची निवड करावी हे समजणं कठीण होऊन जातं. तुम्हाला हेडफोन घ्यायचे आहेत आणि कोणते घ्यावे हे ठरत नाही का? आज आपण हेडफोन विकत घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची ते पाहणार आहोत.
साउंड क्वॉलिटी आणि बेस
हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. जर हेडफोनची साउंड क्वालिटी आणि बेस चांगला नसेल तर हेडफोन्स असूनही त्यांचा काही उपयोग नाही. चांगली साउंड क्वालिटी आणि बेस असलेले हेडफोन्स म्युजिकसह मुव्हीजची मजा देखील वाढवतात.
कंफर्ट
हेडफोन तुमच्या कानांवर नीट बसले पाहिजेत. अनेकदा दीर्घकाळ वापर केल्यावर हेडफोन्समुळे कान दुखू लागतात, असे हेडफोन्स टाळावे. युजर फ्रेंडली हेडफोन्स असतील तर तुम्ही दीघकाल म्युजिक आणि इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकता.
बॅटरी
जर तुम्ही ब्लूटूथ हेडफोन घेण्याचा विचार करत असाल तर त्यांची बॅटरी लाईफ खूप महत्वाची असते. सिंगल चार्जवर तुमचे हेडफोन किती चालणार आहेत हे नक्की बघा. त्यातील जास्त बॅटरी बॅकअप असणारे हेडफोन्स घ्या. काही हेडफोन्स ऑक्स सपोर्टसह येतात म्हणजे बॅटरी संपल्यावर ते वायर्ड हेडफोन्सप्रमाणे वापरता येतात. त्यासाठी ऑक्स केबल देखील मिळते. त्यांचा देखील तुम्ही विचार करू शकता.
हे देखील वाचा:
Google Chrome: चुकूनही अपडेट करू नका गुगल क्रोम ब्राऊजर; मायक्रोसॉफ्ट एज युजर्सनाही सावधानतेचा इशारा