फ्रेंच ब्रँड झूक ने भारतात Zoook Rocker Color Blast ब्लूटूथ स्पिकर लाँच केले आहेत. हा ब्लूटूथ स्पीकर 20 तासांचा प्लेबॅक टाइम देऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. त्याचबरोबर या स्पीकरमध्ये IPX5-वॉटर रेजिस्टंस आणि RGB लाइट्स असे भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. यात SOS अलार्म हे विशेष फीचर देखील आहे.
Zoook Rocker Color Blast ची किंमत
Zoook Rocker Color Blast स्पिकर ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमातून विकत घेता येईल. याची किंमत 3,499 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु ई-कॉमर्स साईट अॅमेझॉन इंडियावरून हा स्पीकर 2,899 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Zoook Rocker Color Blast चे स्पेसिफिकेशन्स
Zoook Rocker Color Blast ब्लूटूथ स्पिकरमध्ये 57mm चे दोन ड्रायव्हर देण्यात आले असू ते 30W देतात. यात एक बिल्ट इन मायक्रोफोन आहे ज्याच्या मदतीने तुम्ही कॉल रिसिव्ह करू शकता आणि रेकॉर्डिंग करू शकता. यातील एलईडी बटन 5 सेकंद दाबून ठेवल्यास चमकदार एसओएस अलार्म चालू आणि बंद होतो. यासाठी यात आरजीबी लाइटिंग देण्यात आली आहे. ब्लूटूथसोबत यात AUX पोर्ट आणि TF कार्डने देखील म्युजिक ऐकता येते.
या झूक ब्लूटूथ स्पिकरमध्ये IPX5 वॉटर रेजिस्टन्स देण्यात आला आहे. या स्पीकरमधील 4,000mAh ची बॅटरी फुल वॉल्यूमवर 10 तास आणि लो वॉल्यूमवर 16-20 तासांचा प्लेबॅक देऊ शकते. ही बॅटरी फक्त 4 तासांत फुल चार्ज होते. हा स्पिकर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही डिवाइसेज सोबत वापरता येतो.