नवी दिल्ली : चीनची कंपनी हुआवेचा सब ब्रँड असलेली ऑनर कंपनी भारतात Honor 10 Lite स्मार्टफोन लाँच करणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर स्मार्टफोनचा टीजर जारी करण्यात आला आहे. सध्या हा स्मार्टफोन ग्राहकांना फक्त फ्लिपकार्टवर मिळणार आहे. दरम्यान, कंपनीने फ्लिपकार्टवर दाखविलेल्या टीजरमध्ये कोणता स्मार्टफोन आहे हे सांगितले नाही. यामध्ये फक्त वॉटर ड्रॉप नॉच दाखविलेले आहे.
Honor 10 Lite स्मार्टफोन चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आला आहे. आता हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात येणार आहे. Honor 10 Lite या स्मार्टफोनच्या आधी Honor 9 Lite स्मार्टफोन भारतात आणला होता. Honor 9 Lite स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी होती. त्यामुळे कंपनीने आता नवीन स्मार्टफोन Honor 10 Lite भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मार्टफोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉट दिला असून याची किंमत जवळपास 15,000 रुपये इतकी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Honor 10 Lite स्मार्टफोनमध्ये Kirin 710 प्रोसेसर आणि लेटेस्ट Android Pie ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. कंपनीच्या सांगण्यानुसार, स्मार्टफोनला प्रीमियम लुक देण्यासाठी 8 लेअर्स दिले आहेत. हे लेअर्स प्लॉस्टिकचे आहेत. मात्र, दिसताना काचेसारखे वाटतात. तसेच, रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे.
स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स...- Kirin 710 प्रोसेसर- Android 9.0 Pie बेस्ड EMUI 9.1.1 ऑपरेटिंग सिस्टिम - 6.21 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले - 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅमचा ऑप्शन- इंटरनल मेमरीसाठी दोन ऑप्शन (64 जीबी आणि 128 जीबी)- मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट- कनेक्टिव्हिटीसाठी 4G VoLTE, वायफाय, ब्लूट्यूथ, जीपीएस- 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा- 24 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा