ऑनरने आपल्या फ्लॅगशिप Honor 50 सीरीजची घोषणा केली आहे. या सीरीजमधील स्मार्टफोन्स 7 जून 2021 रोजी लाँच केले जातील. या स्मार्टफोन सीरीजची घोषणा करताना कंपनीने एक व्हिडीओ शेयर केला आहे, ज्यात ऑनरच्या आगामी अपकमिंग Honor 50 सीरीजच्या लाँचची तारीख कंपनीने सांगितली आहे. Honor ने आपल्या अधिकृत Weibo अकाउंटवर या आगामी स्मार्टफोनचा व्हिडीओ टीजर शेयर केला आहे.
Honor 50 सीरीज कॅमेरा स्पेसिफिकेशन्स
टीजर व्हिडीओच्या माध्यमातून असे समोर आले आहे कि, Honor 50 सीरीजच्या मागील बाजूस दोन कॅमेरा मॉड्यूल देण्यात आले आहेत जे वर्तुळाकार आहेत. तसेच, Honor 50 आणि Honor 50 Pro या दोन्ही स्मार्टफोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स देखील लीक झाले आहेत. Honor 50 Pro स्मार्टफोनचा मुख्य कॅमेरा 108MP चा आहे. परंतु, दुसऱ्या कॅमेरा मॉड्यूलमधील कॅमेरा सेंसरची माहिती मिळाली नाही. Honor 50 स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर, या फोनचा मुख्य कॅमेरा 50MP चा असेल. या देखील स्मार्टफोनच्या दुसऱ्या कॅमेरा मॉड्यूलमधील सेंसरची माहिती उपलब्ध झाली नाही.
Honor 50 Series कंपनीची आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीज आहे, जी 7 जूनला लाँच होणार आहे. या स्मार्टफोन सीरीजमधील छोटा व्हेरिएंट Honor 50 स्मार्टफोन कंपनी Qualcomm Snapdragon 778G SoC सह लाँच करू शकते. तसेच, या सीरीजचा प्रो व्हेरिएंट Snapdragon 888 प्रोसेसरसह सादर केला जाईल. 3C सर्टिफिकेशनच्या लिस्टिंगमध्ये Honor 50 आणि Honor 50 Pro स्मार्टफोनच्या चार्जिंग स्पीडची माहिती मिळाली आहे. दोन्ही फोनमध्ये क्रमश: 66W आणि 100W वायर्ड फास्ट चार्ज सपोर्ट दिला जाऊ शकतो. ऑनरच्या या स्मार्टफोनबद्दल सध्या यापेक्षा जास्त माहिती उपलब्ध झाली नाही.