हुवावेपासून वेगळ्या झालेल्या ऑनरने आपला नवीन स्मार्टफोन मलेशियात सादर केला आहे. हा फोन Honor 50 नावाने बाजारात आला आहे. विशेष म्हणजे हा फोन Google Mobile Services (GMS) सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आता या फोनवर गुगलचे ऍप्स म्हणजे जीमेल, मॅप्स, युट्युब इत्यादी वापरता येतील. या फोनच्या माध्यमातून कंपनीने जागतिक बाजारात पुनरागमन केले आहे. चला जाणून घेऊया Honor 50 स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
Honor 50 चे स्पेसिफिकेशन्स
हा फोन 6.57-इंचाच्या OLED डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. ज्याचे रिजोल्यूशन full HD+ आहे. Honor 50 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G 5G SoC सादर करण्यात आला आहे. ज्याला 8GB RAM आणि 256GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. हा फोन Magic UI 4.2 वर चालतो.
Honor 50 स्मार्टफोनमध्ये 108MP चा मुख्य रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8MP चा वाईड अँगल कॅमेरा आणि 2MP चे दोन कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. हा फोन 32MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पॉवरबॅकअपसाठी Honor 50 मध्ये 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 66W फास्ट चार्जिंगसह येते.
Honor 50 ची किंमत
Honor 50 स्मार्टफोन मलेशियात 1,999 मलेशियन रिंगीट (~ ₹ 36,000) मध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन प्री-ऑर्डर केल्यास Honor Earbuds 2 Lite ट्रू वायरलेस इयरबड्स मोफत देण्यात येतील. हा फोन भारतात लाँच होईल कि नाही याची माहिती मात्र अजूनतरी मिळाली नाही.