शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

दमदार कॅमेऱ्यांचा Honor 8C आला...तोही परवडणाऱ्या किमतीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 6:20 PM

Honor 8C मध्ये पाठीमागे ड्युअल कॅमेरा पहिला 13 मेगापिक्सल f/1.8 अपार्चर आणि दुसरा 2 मेगापिक्सल f/2.4 सेन्सरसह देण्यात आला आहे.

हॉनरचे स्माटफोन प्रामुख्याने ड्युअल रिअर कॅमेरासाठी ओळखले जातात. यंदा कंपनीने AI कॅमेरा तंत्रज्ञान असलेले फोन लाँच केले आहेत. गेल्या महिन्यात जबरदस्त स्मार्टफोन Honor 8X लाँच केला होता. यानंतर हॉनरने Honor 8C हा परवडणारा स्मार्टफोन लाँच केला. चला Honor 8C मध्ये काय खास आहे ते पाहू.Honor 8C मध्ये 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी जवळपास दोन दिवस फोन चार्ज ठेवते. याशिवाय फोनमध्ये 720 पिक्सलची स्क्रीन देण्यात आली आहे. हा डिस्प्ले बॅटरी लवकर संपण्यापासून वाचवितो. तसेच फास्ट चार्जिंगसाठी क्वीक चार्ज 3.0 ही प्रणाली वापरण्यात आली आहे. हॉनर हा ह्युवाईचा सबब्रँड आहे. यामुळे या फोनना Hisilicon Kirin या सहकारी कंपनीचा दमदार प्रोसेसर मिळतो. मात्र, या फोनमध्ये पहिल्यांदाच Qualcomm Snapdragon 632 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर 1.8 गीगाहर्ट्झचा आहे. याशिवाय फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 32 किंवा 64GB चे स्टोरेज देण्यात आले आहे. शिवाय मायक्रोएसडी कार्डही बसवू शकतो. 

हॉनरच्या या 8सी या फोनमध्ये ‘Do Not Disturb’ मोडही देण्यात आला आहे. हे फिचर तुम्ही गेम खेळत असताना सुरु ठेवल्यास नोटिफिकेशन, कॉलमुळे व्यत्यय येत नाही. तसेच या फोनमध्ये EMUI 8.2 ही ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉईड 8.1 ओरियो या ओएसवर देण्यात आली आहे. ब्युटूथ ब्रिज फिचरमुळे एकाचवेळी दोन ब्ल्यूटूथ डिव्हाईसेसना फोन जोडता येतो. Honor 8C मध्ये पाठीमागे ड्युअल कॅमेरा पहिला 13 मेगापिक्सल f/1.8 अपार्चर आणि दुसरा 2 मेगापिक्सल f/2.4 सेन्सरसह देण्यात आला आहे. एआय सेन्सरमुळे हा कॅमेरा 22 प्रकारचे सीन कॅप्चर करू शकतो. पुढच्या बाजुला सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल कॅमेरा LED फ्लॅशसह देण्यात आला आहे. यामुळे कमी प्रकाशात फोन चांगले सेल्फी काढू शकतो. पाठीमागे फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला असून बॉडी मेटल आणि ग्लास अशी मिश्र आहे. फोनचा डिस्प्ले आयपीएस पॅनेलचा 6.26 इंचाचा आहे. याचे रिझोल्युशन 1,520 x 720 पिक्सल आहे. तसेच डोळ्यांना त्रास न होण्यासाठी आय कंफर्ट मोडही देण्यात आला आहे. 

Honor 8C या परवडणाऱ्या फोनची विक्री 10 डिसेंबरला सुरु होणार असून अॅमेझॉनवर उपलब्द असणार आहे.

4 + 32 जीबी रॅमच्या मॉडेलची किंमत 11,999 आणि 4 + 64 जीबी रॅमची किंमत 12,999 रुपये असणार आहे.

टॅग्स :huaweiहुआवेMobileमोबाइल