शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

14 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येईल Honor Band 6; फ्लिपकार्टवरून घेता येईल विकत 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 7:07 PM

Honor Band 6: Honor Band 6 मध्ये अनेक फीचर्ससह फ्लिपकार्टवर लवकरच उपलब्ध होईल. 

चिनी कंपनी Honor लवकरच आपला नवीन स्मार्ट बँड घेऊन येणार आहे. हा बँड Honor Band 6 या नावाने सादर केला जाईल. या बँडच्या लाँचची तारीख जरी समोर आली नसली तरी ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर हा बँड लिस्ट करण्यात आला आहे, त्यामुळे हा डिव्हाईस लवकरच बाजारात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Honor Band 6 will be available on Flipkart ) 

फ्लिपकार्टच्या लिस्टिंगमधून Honor Band 6 ची डिजाईन आणि काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. या फिटनेस ट्रॅकरची खासियत अशी कि हा SpO2 ब्लड मॉनिटरिंग फिचरसह येतो. कंपनीने दावा केला आहे कि डिवाइस ऑप्टिकल हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने अचूकपणे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण सांगू शकतो. तसेच याचा बॅटरी बॅकअप चौदा दिवसांचा असेल.  

Honor Band 6 चे स्पेसिफिकेशन्स  

Honor Band 6 मध्ये 1.43-इंचाची अ‍ॅमोलेड स्क्रीन असेल. या स्क्रीनचे रिजोल्यूशन 194 x 368 पिक्सेल असेल. हा डिस्प्ले 2.5D कर्व ग्लासच्या सुरक्षेसह येईल. या फिटनेस ट्रॅकरच्या बाजूला असलेले बटन नेव्हिगेशनसाठी वापरता येईल. या बँडचे वजन फक्त 18 ग्राम आहे. घरात आणि घराबाहेर धावणे, चालणे, सायकल चालवणे आणि इतर 10 व्यायामाचे प्रकार हा ट्रॅकर ट्रॅक करू शकतो. यात अक्सेलेरोमीटर आणि जायरोस्कोप असे सेन्सर आहेत. या बँडमध्ये ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, ब्लड ऑक्सिजन मॉनिटर सेन्सर, TruSeen 4.0 हार्ट रेट मॉनिटरिंग, TruSleep 2.0 स्लिप ट्रॅकिंग आणि TruRelax स्ट्रेस ट्रॅकिंग असे फीचर्स मिळतात. हा बँड तुम्ही व्यायाम करत आहात कि नाही हे देखील सांगू शकतो.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान