Honor लवकरच आपली नवीन स्मार्टफोन सीरिज बाजारात सादर करणार आहे. ही सिरीज Magic 3 नावाने चीनमध्ये 12 ऑगस्टला लाँच केली जाऊ शकते. Honor चे सीईओ जॉर्ज झाओ यांनी अलीकडेच या स्मार्टफोनचा बॅक पॅनल सोशल मीडियावर शेयर केला होता. आता Magic 3 सीरिजचा स्मार्टफोन बेंचमार्किंग साईट गिकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.
जॉर्ज यांनी शेयर केलेल्या फोटोवरून समजले आहे कि या फोनच्या बॅक पॅनलवर पेंटा कॅमेरा सेटअप देण्यात येईल. हे पाच कॅमेरे वर्तुळाकार सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह दिले जातील. त्याचबरोबर फोनच्या मागे एक मायक्रोफोन देखील दिसला आहे. या स्मार्टफोनच्या लीक रेंडरमधून देखील या डिजाईनला दुजोरा मिळाला आहे. रेंडर्सनुसार, Magic 3 स्मार्टफोनच्या फ्रंटला कर्व डिस्प्ले ड्युअल सेल्फी कॅमेऱ्यासह दिला जाईल.
Honor Magic 3 स्मार्टफोन Geekbench वेबसाइटवर क्वॉलकॉम Snapdragon 888 Plus SoC सह दिसला आहे. या चिपसेटमधील मुख्य कोर CPU चा क्लॉक स्पीड 2.995GHz करण्यात आला आहे. तसेच या प्लस व्हेरिएंट चिपसेटची AI परफॉर्मन्स 20 टक्क्यांनी सुधारली आहे. या चिपसेटला Adreno 660 GPU ची जोड देण्यात आई आहे. मॉडेल नंबर ELZ-AN10 असलेला हा ऑनर फोन 8GB रॅम आणि Android 11 सह लिस्ट केला गेला आहे. गिकबेंचवर या स्मार्टफोनला सिंगल कोरमध्ये 3556 आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 10257 स्कोर मिळाला आहे.