काही दिवसांपूर्वी Honor Play5T Pro ची माहिती इंटरनेटवर लीक झाली होती. त्यानुसार आज हा स्मार्टपहन कंपनीने चीनमध्ये लाँच केला आहे. हा एक मिड-रेंज 4G गेमिंग स्मार्टफोन म्हणून सादर केला आहे. यासाठी कंपनीने यात Helio G80 चिपसेट आणि 8GB रॅम दिला आहे. भारतसह जगभरात हा स्मार्टफोन कधी लाँच केला जाईल याची माहिती कंपनीने दिली नाही.
Honor Play5T Pro चे स्पेसिफिकेशन्स
Honor Play5T Pro स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 94.2 टक्के आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये Helio G80 चिपसेट देण्यात आला आहे. या चिपसेटला 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. हा फोन Android 10 आधारित Magic UI 4.0 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
Honor Play5T Pro स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि दुसरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या ऑनर स्मार्टफोनमध्ये 4000mAh ची बॅटरी 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.
Honor Play5T Pro ची किंमत
Honor Play5T Pro चा एकमेव 8GB + 128GB व्हेरिएंट चीनमध्ये 1,499 युआन (सुमारे 17,200 रुपये) आहे. हा फोन कंपनीने मॅजिक नाइट ब्लॅक आणि टायटेनियम सिल्वर रंगात सादर केला आहे. हा फोन भारतात कधी येणार याची माहिती मात्र कंपनीने दिलेली नाही.