ऑनरने आज चीनमध्ये चार स्मार्टफोन लाँच केल्ले आहेत. एकीकडे कंपनीने आपल्या फ्लॅगशिप मॅजिक 3 सीरिजमध्ये Honor Magic 3, Magic 3 Pro आणि Magic 3 Pro+ असे तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. दुसरीकडे कंपनीने आपला मिडरेंज Honor X20 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये कंपनीने MediaTek Dimensity 900 SoC चा वापर केला आहे. तसेच Honor X20 5G स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा मिळतो. या फोनच्या मागे आकर्षक वर्तुळाकार ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Honor X20 चे स्पेसिफिकेशन्स
Honor X20 स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2376 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी Honor X20 स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 900 SoC चिपसेट आणि Mali G68 GPU मिळतो. त्याचबरोबर या फोनमध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा ऑनर फोन Android 11 आधारित Magic UI 4.2 वर चालतो.
Honor X20 5G च्या बॅक पॅनलवर वर्तुळाकार ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. तसेच फ्रंट पॅनलवरील पिल शेप कटआऊटमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी मिळतो. या 5G फोनमध्ये कंपनीने सिक्योरिटीसाठी साइड माउंट फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. Honor X20 5G मधील 4,300mAh ची बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Honor X20 5G ची किंमत
Honor X20 5G स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट चीनमध्ये सादर करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनचा छोटा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 1,899 युआन (अंदाजे 21,700 रुपये) मध्ये विकत घेता येईल. तसेच 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 2,199 युआन (अंदाजे 25,100 रुपये) आणि 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 2,499 युआन (अंदाजे 28,600 रुपये) मध्ये उपलब्ध झाला आहे.