रगड स्मार्टफोनच्या कॅटेगरीमध्ये अजून एका नव्या हँडसेटची एंट्री झाली आहे. मजबूत बिल्ड असलेला Hotwav W10 रगड स्मार्टफोन 15,000mAh बॅटरीसह बाजारात आला आहे. एका सामान्य स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात येते, त्यामुळे त्यामुळे हा फोन तीन स्मार्टफोनच्या पावर बॅकअपसह लाँच झाला आहे. Hotwav W10 ची किंमत देखील बजेटमध्ये आहे.
Hotwav W10 चे स्पेसिफिकेशन्स
Hotwav W10 रगड स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 720×1,600 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. फोनला Mediatek Helio A22 ची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. सोबत 4GB RAM आणि 32GB स्टोरेज मिळते. या फोनची स्टोरेज तुम्ही मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 512GB पर्यंत वाढवू शकता.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात 13MP मुख्य सेन्सर आहे. फ्रंटला 5MP सेल्फी कॅमेरा आहे. MIL-STD810H सर्टिफाइड आहे, जो मिल्ट्री-ग्रेड ड्यूरिबिल्टी देतो. तर IP68 आणि IP69K रेटिंग वॉटर आणि डस्ट रजिस्टन्स दर्शवतो. सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर आहे.
फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात मिळणार तीन स्मार्टफोनची पावर. Hotwav W10 स्मार्टफोन 15000mAh च्या दमदार बॅटरीसह येतो. ही बॅटरी सिंगल चार्जवर 28 तासांचा व्हिडीओ प्लेटाइम देऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. हा फोन 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
Hotwav W10 ची किंमत
Hotwav W10 ची किंमत 99.99 डॉलर्स (जवळपास 8,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. 1 जुलैनंतर मात्र हा फोन 139 डॉलर्स (जवळपास 11,000 रुपये) मध्ये विकला जात आहे. हा फोन ग्रे आणि ऑरेंज कलर ऑप्शनमध्ये येतो.