Apple iPhone बाजारात जबरदस्त कॅमेरा गुणवत्तेसाठी ओळखले जातात. या फोन्सच्या उत्तम कॅमेऱ्याच्या गुणवत्तेमुळे इतर स्मार्टफोनपेक्षा आयफोन वेगळे ठरतात. त्यामुळे आयफोनची किंमतही इतरांच्या तुलनेत अधिक असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या फोनमध्ये इतका चांगला फोटो कसा येतो? या फोनच्या कॅमेऱ्यासमोर सगळे कॅमेरे फिके का पडतात? अॅपल कंपनीचे सीईओ टिम कुक यांनीच आता यामागचं गुपीत उघड केलं आहे.
Apple चा पहिला iPhone जून २००७ मध्ये लॉन्च झाला होता. iPhone मध्ये वापरल्या जाणार्या कॅमेर्याच्या डिटेल्ससोबतचे Apple ने नुकतंच इतर मुख्य फिचर्स उघड केले आहेत. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी सांगितलं की, अॅपल आयफोनमध्ये सोनी कंपनीचा कॅमेरा सेन्सर वापरला जातो. तसंच इतरही माहिती त्यांनी दिली.
जपान दौऱ्यात 'सोनी'च्या अधिकाऱ्यांची बैठकनुकतंच टिम कुक यांनी जपान दौरा केला. जिथं त्यांनी Apple ची एज्युकेशन टूल्स, डेव्हलपर आणि कंपनीच्या लोकल टीम्सचा वापर करून शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याशिवाय Sony कंपनीचे अधिकारी आणि Sony च्या CEO यांना टीम कूक भेटले. या बैठकीदरम्यान कूक यांनी आयफोनमध्ये सोनी कंपनीचा कॅमेरा लेन्स वापरली जात असल्याचा खुलासा केला.
टीम कूक यांनी ट्विट करुन मानले आभारटीम कूक यांनी सोनी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेत खुलासा केला की Apple कंपनी गेल्या १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून स्मार्टफोनमध्ये सोनी कंपनीची कॅमेरा लेन्स वापरत आहे. आयफोनसाठी जगातील आघाडीच्या कॅमेरा सेन्सर बनवणाऱ्या सोनी कंपनीसोबत गेल्या १० वर्षांपासून अधिक काळापासून आम्ही भागीदार राहिले आहोत, असं सांगताना कूक यांनी केन आणि टीममधील सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले.
Apple ला त्यांच्या iPhones मध्ये वापरल्या जाणार्या कॅमेऱ्यांबद्दल काहीही शेअर करण्याचा अधिकार नव्हता. पण लेन्सचा आकार आणि एपर्चरची माहिती शेअर केली जाते. जसं की iPhone 14 Pro Max आणि iPhone 14 Pro वर वापरला जाणारा ƒ/1.78 अपर्चर असलेला ४८-मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा आहे. पण Apple ने कॅमेरा सेन्सर सोनी कंपनीचा वापरला जातो याची माहिती कधी जाहीर करण्यात आली नव्हती. आता खुद्द टीम कूक यांनीच ही माहिती शेअर केली आहे.