नवी दिल्ली - स्मार्टफोन युजर्सच्या संख्येत मोठी वाढ होत तर दुसरीकडे स्मार्टफोनवर डेटाचा वापर करण्यासाठी कंपन्या एका पेक्षा एक जबरदस्त डेटा प्लॅन्स ऑफर करत आहेत. तसेच युजर्सना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या नेटवर्कला मजबूत करण्यासाठी कंपन्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत. अनेक कंपन्या आपल्या स्मार्टफोनला 4G VoLTE सपोर्टसह लाँच करत आहेत. मात्र तरीही काही ठिकाणी नेटवर्कची समस्या वाढते आहे. त्यामुळे इंटरनेट स्पीडमध्ये काम करत नाही.
इंटरनेट स्पीड कमी असल्याची अनेकांची तक्रार असते. मात्र काही सोप्या पद्धतीने फोनचा इंटरनेट स्पीड वाढवता येतो. जाणून घेऊया कसं...
- सर्वप्रथम फोनच्या सेटिंग्जमध्ये जा.
- सेटिंग्समध्ये गेल्यावर नेटवर्क सेटिंग्ज पर्यायावर क्लिक करा.
- येथे प्रीफर्ड टाईप ऑफ नेटवर्क या पर्यायावर जावून 4G किंवा LTE सिलेक्ट करा.
- नेटवर्क सेटिंग्समध्ये एक्सेस पॉइंट नेटवर्क (APN) सेटिंग चेक करावी लागेल. जर योग्य APN निवडला नाही, तर APN पर्यायात सेटिंग्जला डिफॉल्ट सेट करावं लागेल.
फोनमध्ये असलेले Apps देखील इंटरनेट स्पीड कमी करतात. अनेकदा Apps बॅकग्राउंडमध्ये सुरू असतात आणि डेटाही खर्च होत राहतो. डेटाचा वापर कमी करण्यासाठी व्हिडीओजचा ऑटो प्ले मोड बंद करा. तसंच Apps मध्ये मीडिया फाईल्सचं ऑटो डाऊनलोडही बंद करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
चार्जिंगबद्दल डोन्ट वरी! फक्त 20 रुपयांत रेंटवर घ्या पॉवर बँक मग हवी तेवढी चालणार बॅटरी
स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचा वापर हा केला जातो. मात्र अनेकदा सतत फोन सुरू असल्याने फोनची बॅटरी लवकर लो होते. नेमका कामाच्या वेळेस फोन चार्ज करता न आल्याने बंद होतो आणि विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच स्मार्टफोन युजर्ससाठी एक खूशखबर आहे. त्यांना आता चार्जिंगचं टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण देशात पहिली स्मार्टफोन पॉवर बँक रेंटल सर्व्हिस 'स्पाईक' (Spykke) लाँच झाली आहे. संपूर्ण देशात 11 शहरांत 8 हजार ठिकाणी याचं नेटवर्क आहे. सध्या कंपनीचे आऊटलेट बंगळुरू, दिल्ली, मुंबई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, कोईंबतूर, चंडीगढ, लखनऊ, जयपूर आणि पुणे येथे आहे. एका आऊटलेटमधून पॉवर बँक रेंटवर घेऊन दुसऱ्या आऊंटलेटवर ती रिटर्न करता येऊ शकते.
टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....