नवी दिल्ली - घरगुती गॅस सिलिंडरसाठी (Gas Cylinders Price) सध्या ग्राहकांना जवळपास 800 हून जास्त पैसे मोजावे लागत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र आता ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार थोडा हलका होणार आहे. पेटीएमने एक जबरदस्त ऑफर आणली असून यामध्ये ग्राहकांना 100 रुपये स्वस्त दराने गॅस सिलिंडर मिळणार आहे. पेटीएमद्वारे पहिले गॅस सिलेंडर बुक केला तर तुम्हाला 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. आपण पैसे देताच आपल्याला एक स्क्रॅच कार्ड जारी होणार आहे.
जाणून घ्या, कसा घ्यायचा 'या' ऑफरचा लाभ
- सर्वप्रथम Paytm App डाऊनलोड करा. त्यानंतर लॉगिन करा.
- बुक गॅस सिलेंडर (Book Gas Cylinder) या पर्यायावर क्लिक करा.
- भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडेन गॅसमधील तुमच्या गॅसचा पर्याय निवडा
- रजिस्टर मोबाईल नंबरवर आपला LPG ID भरा.
- यानंतर तुम्हाला पेमेंट पर्याय दिला जाईल.
- सर्व माहिती भरल्यानंतर खाली देण्यात आलेल्या ऑफरमध्ये 100 रुपये कॅप्शन असलेला पर्याय निवडा.
- यानंतर ग्राहकांनी उचित कॅशबॅक दिला जाईलं.
"या" आहेत काही अटी
- पहिल्यांदा सिलिंडर बुक करणाऱ्यांनाच ही खास ऑफर मिळणार आहे. पेटीएमवरून आधीच बुक केला असेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही.
- युजर्सना यासाठी कमीत कमी 500 रुपये भरावे लागतील.
- 31 मार्च 2021 पर्यंत ही ऑफर आहे.
- सिलिंडर बूक केल्यानंतर 24 तासांच्या आतमध्ये स्क्रॅच कार्ड मिळेल.
- स्क्रॅच कार्ड मिळालेल्या रकमेनुसार आपल्याला फायदा होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
LPG सिलिंडर खरेदीवर 30 लाखांचा विमा मोफत मिळणार, कठीण काळात मोठा फायदा होणार
एलपीजी सिलिंडर सध्या आपल्या वाढत्या किंमतींमुळे चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांत सिलिंडरचे भाव वाढले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, या 14 किलो गॅस सिलिंडरबरोबरच तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा देखील मिळतात. या सिलिंडरबरोबरच प्रत्येक ग्राहकांच्या कुटूंबाला विमा देखील दिला जातो. प्रत्येक सिलिंडरवर विमा असतो. दुर्दैवाने जर सिलिंडरचा स्फोट झाला किंवा तोटा झाला तर तुम्ही विमा वापरू शकता. या विम्याच्या माध्यमातून तुम्ही नुकसानीची भरपाई करू शकता. एलपीजी सिलिंडर देणार्या कंपन्या कोणत्याही अनुचित घटनेविरूद्ध विमा प्रदान करतात.
LPG सिलिंडरसंदर्भात मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय; बदलला 'हा' नियम
येत्या दोन वर्षांत सरकार देशातील लोकांना 1 कोटी मोफत एलपीजी कनेक्शन देणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारीही केली जात आहे. देशातील प्रत्येक घरात एलपीजी कनेक्शन मिळावे यासाठी सरकार उज्ज्वलासारखी योजना चालवित आहे. त्याअंतर्गत येत्या दोन वर्षांत 1 कोटी मोफत एलपीजी कनेक्शनचे वितरण केले जाणार आहे, यासाठीचे नियम बदलण्याचीही सरकार तयारी करत आहे. तरुण कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार किमान कागदपत्रांत एलपीजी कनेक्शन देण्याची तयारी करत आहे. बदललेल्या नियमांमध्ये रहिवासी दाखला नसतानाही एलपीजी कनेक्शन देण्याची योजना आहे.