नवी दिल्ली- गेल्या काही वर्षांपूर्वी व्हॉट्सअॅप ग्राहकांच्या सेवेत आलं. व्हॉट्सअॅप लाँच झाल्यापासून युझर्सचा त्याला उदंड प्रतिसादही लाभला. अल्पावधीत व्हॉट्सअॅप हे अॅप युझर्समध्ये लोकप्रिय झालं. व्हॉट्सअॅपनं लोकांना प्रत्यक्ष पाहत संवाद साधण्याचं माध्यम उपलब्ध करून दिलं. तसेच व्हॉट्सअॅपनं स्वतःमध्ये अनेक बदल करत डॉक्युमेंट सेंडिंग, वॉईस मेसेज, व्हिडीओ व्हॉइस कॉलिंगसारखे पर्याय उपलब्ध करून दिले. आता व्हॉट्सअॅपनं आणखी एक नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.या सुविधेच्या माध्यमातून तुम्हाला ट्रेनचं लाइव्ह स्टेट्स समजणार आहे. ब-याचदा ट्रेन कुठपर्यंत आली आहे हे समजत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे प्रवाशांना मोठा नाहक त्रास होत होता. याचाच विचार करून व्हॉट्सअॅपनं लाइव्ह स्टेट्सची सुविधा सेवेत आणली आहे. भारतीय रेल्वेनं तुम्हाला आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही ट्रेनच्या लाइव्ह स्टेट्सची स्थिती समजण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता 139 या रेल्वे हॉटलाइन नंबरवर फोन करून तुम्हाला ट्रेनची स्थिती जाणून घेण्याची गरज नाही. व्हॉट्सअॅपच्या एक मेसेजमध्ये तुम्हाला ट्रेनचं लाइव्ह स्टेट्स, वेळ आणि ट्रेनचं स्टेशन समजणार आहे.व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कसं तपासाल तुम्ही लाइव्ह ट्रेनचं स्टेट्स
- पहिल्यांदा तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 7349389104 हा नंबर सेव्ह करावा.
- व्हॉट्सअॅप सुरू करून 7349389104 या नंबरवर ट्रेनच्या नंबरचा मेसेज टाकावा
- त्यानंतर 10 मिनिटं थांबवं, तुम्हाला ट्रेनसंदर्भात सर्व माहिती उपलब्ध होईल.