नवी दिल्ली - इन्स्टंट मेसेजिंग अॅप असलेल्या व्हॉट्सअॅपने आपल्या अॅपमध्ये पेमेंट करण्याचाही पर्याय दिला. व्हॉट्सअॅपने आता UPI पेमेंट सर्व्हिसची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. UPI पेमेंटचा वापर करत WhatsApp द्वारे संपूर्ण देशात पैसे पाठवता येतात. तसेच बँक अकाउंट बॅलेन्सही चेक करता येतो. व्हॉट्सअॅपने हे पेमेंट फीचर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत पार्टनरशिपमध्ये डिझाईन केलं आहे. व्हॉट्सअॅपच्या मदतीने पैसे पाठवण्यासाठी सर्वात आधी युजर्सकडे देशामध्ये बँक अकाऊंट अथवा डेबिट कार्ड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
जर तुम्ही WhatsApp Account मध्ये UPI Payment अद्यापही सेट केलं नसेल, तर हा पेमेंट ऑप्शन सेट करू सकता. व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन हा पर्याय निवडता येईल.सर्वात आधी उजव्या बाजूला वर असलेल्या तीन लाइनवर क्लिक करावं लागेल.त्यानंतर ज्या बँक अकाउंटला तुमचा WhatsApp नंबर जोडलेला आहे, तोच फोन नंबर युजर या WhatsApp Payment मध्ये जोडू शकतात. म्हणजे ज्या नंबरवर तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट आहे, त्या नंबरवरच तुमचा बँक अकाउंट नंबर रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. शेवटी UPI PIN सेट करावा लागेल. या PIN द्वारेच ट्रान्झेक्शन करता येईल.
असे पाठवा व्हॉट्सअॅपवरून पैसे
- व्हॉट्सअॅपवरून ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत. त्या व्यक्तीचं चॅट ओपन करा.
- त्यानंतर अटॅचमेंट आयकॉनवर जा. पेमेंटच्या पर्यायावर क्लिक करा.
- जितके पैसे पाठवायचं आहेत. ती रक्कम टाका. रक्कम टाकल्यानंतर सेंडवर क्लिक करा.
- सुरक्षिततेसाठी आपला UPI पिन टाका. यानंतर पैसे पाठवले जातील.
बँक अकाऊंट बॅलेन्सही चेक करता येतो तो कसा करायचा हे जाणून घ्या...
- सर्वात आधी WhatsApp ओपन करा. पेमेंट पर्यायावर जा.
- त्यानंतर बँक अकाऊंट सिलेक्ट करावं लागेल.
- View Account Balance वर क्लिक करा. आता PIN टाकावा लागेल.
- PIN टाकल्यानंतर बँक अकाऊंट बॅलेन्स दिसेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....