नवी दिल्ली - गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. इंटरनेट सर्च, कॅलेंडर, स्मार्ट असिस्टेंट, मॅप्स आणि लोकेशन डेटा पर्यंत युजर्सची सर्व माहिती ही गुगलकडे असते. त्यामुळेच युजर्सच्या मृत्यूनंतर गुगल अकाऊंटचं काय होणार असा प्रश्न अनेकांना असतो. मात्र काळजी करण्याचं काही कारण नाही कारण युजर्सच्या मृत्यूनंतर गुगल अकाऊंट आपोआप डिलीट होतं.
मृत्यूनंतर अकाउंट बंद करण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो
- गुगल अकाऊंट साइन इन करा. त्यानंतर माय अकाऊंट वर जा. डेटा अॅण्ड पर्सनलायझेशन या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Download, Delete किंवा make a plan for your data असे तीन पर्याय असलेले समोर दिसतील.
- Make a plan for your data वर क्लिक करा. त्यानंतर इनअॅक्टिव्ह अकाऊंट मॅनेजर ही विंडो ओपन होईल. तेथे Change This Setting हा पर्यायावर क्लिक करा.
- गुगल अकाऊंटमध्ये ऑटो डिलिटिंग प्रक्रिया चालू करण्यासाठी Start वर क्लिक करा. आता अकाऊंट बंद असण्याचा कालावधी निवडावा लागेल. या कालावधी 3 ते 18 महिने या पैकी एक पर्याय निवडून ठरवावा लागेल. या ठिकाणी युजरला आपला फोन नंबर, ई-मेल अॅड्रेस आणि रिकव्हरी ई-मेल अशी माहिती द्यावी लागेल. त्यानंतर Next वर क्लिक करा.
- युजर्सच्या मृत्यूनंतर ज्या कॉन्टॅक्टसना सूचना जायला हवी; अशा 10 जणांना निवडा. यापुढे गुगल अकाऊंटचं ऑटो डिलीशन मान्य करावं लागेल. 'Yes, delete my inactive Google Account' हा पर्याय निवडा. युजरचं इनअॅक्टिव्ह गुगल अकाउंट बंद करावे याची मान्यता हा पर्याय घेतो. Review Plan वर क्लिक करा.
- Review केल्यानंतर कन्फर्म प्लॅनवर क्लिक करा.
गुगल असिस्टंट अधिक स्मार्ट होणार, Whatsapp मेसेज वाचून दाखवणारगुगल हे लोकप्रिय सर्च इंजिन असून त्याचा वापर विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी केला जातो. गुगल असिस्टंट अपडेट होत असतं. यामध्ये अनेक नवनवीन फीचर येत असतात. गुगलचं व्हॉईस बेस्ड व्हर्चुअल असिस्टंट लवकरच व्हॉट्सअॅपवर येणारे मेसेज वाचून दाखवणार आहे. रिपोर्टनुसार, गुगल असिस्टंटचं हे नवं फीचर व्हॉट्सअॅप, टेलीग्राम, स्लॅकसारख्या अॅप्सवर येणारे मेसेज केवळ वाचून दाखवणार नाही तर त्यांना रिप्लाय देण्यासाठी देखील सक्षम असणार आहे. स्मार्टफोनमधील डिफॉल्ट मेसेज आणि गुगल हँगआऊटचे मेसेज सध्या यामाध्यमातून ऐकले जात आहेत. गुगल असिस्टंटच्या मदतीने मेसेज वाचण्यासाठी जेव्हा युजर्स कमांड देतील तेव्हा सर्वप्रथम नोटीफिकेशन अॅक्सेसची परवानगी घेतली जाईल. गुगल असिस्टंट फीचरमध्ये एकदा सर्व परमिशन्स अलाऊ केल्यानंतर तसेच फीचर अनेबल केल्यावर असिस्टंट युजर्सना लास्ट मेसेज वाचून दाखवेल.
आवाजापासून लोकेशनपर्यंत युजर्सच्या सर्व गोष्टींवर गुगलची नजर; त्वरीत बदला 'या' सेटिंग्स
गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्याएका क्लिकवर अगदी सहज मिळते. इंटरनेट सर्च, कॅलेंडर, स्मार्ट असिस्टेंट, मॅप्स आणि लोकेशन डेटा पर्यंत युजर्सची सर्व माहिती ही गुगलकडे असते. गुगल प्रत्येक ठिकाणी युजर्सना ट्रॅक करत असतं. आवाजापासून लोकेशनपर्यंत युजर्सच्या सर्व गोष्टींवर गुगलची नजर असते. युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे महत्त्वाची खासगी माहिती सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच गुगल अकाऊंटच्या सेटिंग्समध्ये काही बदल करणं आवश्यक आहे.