नवी दिल्ली - आधार कार्ड (Aadhaar Card) संबंधित आता एक खास अपडेट देण्यात आलं आहे. युजर्स आपलं आधार कार्ड हे फेस ऑथेंटिकेशनच्या (Face Authentication) माध्यमातून डाऊनलोड करू शकतात. फेस ऑथेंटिकेशनने Aadhaar Card नेमकं कसं डाऊनलोड करायचं हे जाणून घेऊया...
- सर्वप्रथम गुगलवर UIDAI असं सर्च करा. असं केल्यानंतर UIDAI ची वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा.
- UIDAI च्या वेबसाईटवर गेल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. येथे युजर्सना अनेक पर्याय दिसतील.
- पेजवर सर्वात खाली Get Aadhaar Card आणि Update Aadhaar Card असा एक पर्याय मिळेल.
- Get Aadhaar Card पर्यायावर आपल्या आणखी एक पर्याय मिळेल. डाऊनलोड आधार कार्डवर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यावर आधार कार्ड पर्यायअंतर्गत फेस ऑथेंटिकेशनचा पर्याय मिळेल.
- फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करण्याआधी तुम्ही तुमचा फोन नंबर टाका. त्यासोबत कॅप्चा देखील द्या. त्यानंतर फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करा.
- क्लिक केल्यावर एक इंस्ट्रक्शन पेज दिसेल. त्यामध्ये फेस ऑथेंटिकेशनसमोर तुम्हाला तुमचा फोटो कसा काढायचा याकडे लक्ष द्या. यानंतर ओके बटणावर क्लिक करा.
- कॅमेरा ओपन होईल. प्रकाशाच्या दिशेने लक्ष देऊन तुमचा चेहरा त्यासमोर आणा. त्यानंतर वेबसाईट ऑटोमॅटिकली तुमचा फोटो क्लिक करेल.
- फोटो क्लिक झाल्यानंतर आधार कार्ड डाऊनलोड होईल. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अरे व्वा! आता जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तयार करा आपलं Aadhaar Card; जाणून घ्या नेमकं कसं?
आपण जवळच्या पोस्ट ऑफिसवर आधार कार्डची (Aadhaar Card) नोंदणी किंवा अपडेशन करू शकता, यासाठी या सुविधेची संपूर्ण यादी प्रत्येक राज्यात उपलब्ध आहे असं म्हटलं आहे. आधारच्या डेमोग्राफीचा तपशील म्हणजेच नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अद्ययावत करण्यासाठी आधार नोंदणी केंद्रात जावं लागतं. आता ही सर्व कामं पोस्ट ऑफिसमध्ये केली जाणार आहेत. बायोमेट्रिक तपशील देखील आधार सेवा केंद्रात अद्ययावत केले जातील. आता हे काम पोस्ट ऑफिसमध्ये देखील करता येणार आहे. आपली आधार माहिती अद्ययावत झाल्यास त्याकरिता आपल्याला चार्ज द्यावे लागेल. प्रत्येक वेळी माहिती अद्ययावत केल्यावर याची किंमत 50 रुपये आहे.
आधार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अपडेट करता येते. बहुतेक कामे ऑनलाईन करता येतात. मात्र काही कामांसाठी आधार केंद्रात जाणे आवश्यक आहे. बायोमेट्रिक ओळख अद्ययावत करायची असेल तर आधार केंद्रावर जाणे आवश्यक आहे. आपल्याकडे जुना नोंदणीकृत नंबर नसल्यास मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल. ओटीपीशिवाय अद्ययावत करण्याची कोणतीही प्रक्रिया पूर्ण होणार नाही. अशा परिस्थितीत, आपल्याकडे मोबाईल नंबर नसल्यास आपण ऑनलाईन काहीही करू शकणार नाही.