फेसबुक नंतर ट्विटरचे नाव घेतले जाते. या लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग ऍपचे युजर्स देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. ट्विटरवर शब्दांसोबत फोटो आणि व्हिडीओ देखील शेयर करता येतात. यातील फोटो सहज डाउनलोड करता येतात परंतु व्हिडीओ डाउनलोड करणे सोप्पे नाही. हे काम सोप्पे नाही परंतु अशक्य देखील नाही.
जर ट्विटरवर तुम्हाला एखादा व्हिडीओ दिसला आणि तुम्हाला तो सेव करायचा असेल तर त्या Tweet चा URL तुम्ही सेव केला पाहिजे. तुम्हाला व्हिडीओ सेव करण्याचा ऑप्शन मिळणार नाही. परंतु ट्विटरच्या बाहेर अश्या वेबसाईट्स आहेत ज्या ट्विटर व्हिडीओ सेव करण्यास मदत करतात. Twitter वरून व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी पुढील पद्धत वापरा.
Twitter वरून व्हिडीओ कसा डाउनलोड करायचा?
- Twitter वरून व्हिडीओ सेव करण्यासाठी सर्वप्रथम व्हिडीओ असलेला ट्वीट ओपन करा.
- आता त्या ट्वीटचा URL कॉपी करा, ट्विट खालील शेयर बटनवर क्लीक केल्यावर ‘Cop Link’ वर क्लिक करून तुम्ही त्या ट्विटची लिंक कॉपी करू शकता.
- त्यानंतर SaveTweetVid किंवा TwitterVideoDownloader वेबसाइट तुमच्या ब्राऊजरमध्ये ओपन करा.
- तिथे होम पेजवरील बॉक्समध्ये कॉपी केलेला URL पेस्ट करा.
- त्यानंतर खाली आलेल्या Download बटण वर क्लिक करा.
- दोन्ही वेबसाइटवर तुम्हाला व्हिडीओ क्वालिटीची निवड करावी लागले.
- क्वालिटी निवडल्यानंतर डाउनलोड बटण वर क्लिक करा.
- त्यानंतर व्हिडीओ फुल स्क्रीनमध्ये प्ले होऊ लागेल.
- व्हिडीओवरील तीन डॉट्सवर क्लिक करून व्हिडीओ सेवा करा. म्हणजे हा व्हिडीओ डाउनलोड होऊ लागेल.