Microsoft ने गेल्या महिन्यात आपल्या नवीन ऑपरेटिंग सिस्टमची घोषणा केली आहे. ही ऑपरेटिंग सिस्टम Windows 10 ची जागा घेईल आणि हिचे Windows 11 असेल. कंपनीने Windows 11 ची घोषणा केली आहे परंतु सामान्य ग्राहकांसाठी ही ऑपरेटिंग सिस्टम कधी उपलब्ध होईल याची माहिती मात्र दिली नाही. काही रिपोर्ट्सनुसार ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम या वर्षाच्या अखेरीस डाउनलोडसाठी उपलब्ध होईल. तसेच सर्वच विंडोज लॅपटॉप्स आणि पीसीसाठी Windows 11 चा अपडेट मिळणार नाही, असे देखील कंपनीने सांगितले आहे. (How to Download Windows 11 Insider Preview Builds)
पंरतु एक अशी पद्धत आहे जिच्या मदतीने तुम्ही त्वरित तुमच्या पीसीवर विंडोज 11 इंस्टॉल करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त विंडोज इंसायडर प्रोग्राम जॉइन करावा लागेल. या प्रोग्राम अंतगर्त युजर्सना Windows 11 चा अर्ली अॅक्सेस मिळेल. विंडोज इंसायडर प्रोग्रॅम द्वारे विंडोज 11 को डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप फॉलो कराव्या लागतील.
How to Install Windows 11
- सर्वप्रथम तुमच्या पीसीवर Windows बटन दाबून स्टार्ट मेन्यूमध्ये जा
- त्यानंतर Settings मध्ये जाऊन Update & Security ची निवड करा.
- तिथे डाव्या कोपऱ्यात असलेल्या Windows Insider Program वर क्लिक करा. त्यानंतर Get started सिलेक्ट करा.
- त्यानंतर तुमचे रजिस्टर्ड मायक्रोसॉफ्ट अकॉउंट कनेक्ट करा.
- त्यानंतर Dev Channel ची निवड करा, बस्स!
- आता Windows 11 Insider Preview Builds मिळवण्यासाठी पीसी रिस्टार्ट करा.
- पीसी रिस्टार्ट झाल्यावर Update & Security मध्ये Windows 11 इंस्टॉल करण्याचा पर्याय मिळेल.