कधी कधी इतरांच्या डिवाइसचा वापर करून Facebook अकॉउंटवर लॉग-इन करावे लागते. काम पूर्ण झाल्यावर अनेकदा लॉग आउट करायचे राहून देखील जाते. किंवा एखाद्या आपल्याच बिघडलेल्या फोन किंवा लॅपटॉपवर आपले फेसबुक अकॉउंट असते आणि असा डिवाइस रिपेरिंगला गेला असतो. अशावेळी आपल्या अकॉउंटचा कोणीतरी गैरफायदा घेईल अशी भीती कायम राहते.
किंवा तुमच्या लक्षात नसेल कि नेमकं किती डिवाइसवर तुमचं अकॉउंट लॉग इन आहे तर तुम्ही पुढील ट्रिक वापरू शकता. पुढे आम्ही अशी पद्धत सांगितली आहे, जिच्या मदतीने तुम्ही एक साथ सर्व डिवाइसवरून तुमचे अकॉउंट लॉग आउट करू शकता.
Facebook Account एक साथ अनेक डिवाइसवरून लॉग आउट करण्यासाठी:
- सर्वप्रथम फेसबुक अॅप ओपन करा. त्यानंतर उजवीकडे असलेल्या साईड बारवर क्लिक करा.
- त्यानंतर खाली स्क्रोल करून Setting & Privacy ऑप्शनवर क्लिक करा.
- त्यांनतर Setting वर क्लिक करा.
- आता Password and Security ऑप्शनची निवड करा.
- इथे Where you’re logged in समोर असलेल्या See all वर क्लीक करा म्हणजे तुम्हाला तुमचे फेसबुक अकॉउंट लॉग इन असलेल्या डिवाइसची यादी दिसेल.
- इथे तळाला स्क्रोल करून तुम्ही Log Out of All sessions वर क्लिक करून सर्व डिवाइसमधून लॉग आऊट करू शकता.
- किंवा प्रत्येक डिवाइस समोर असलेल्या तीन डॉट्सवर क्लीक करून त्या डिवाइसवरून लॉग आऊट करू शकता.