मुंबई
सोशल मीडियातील महत्वाचं व्यासपीठ असलेल्या Facebook चा वापर जवळपास इंटरनेटवर सक्रीय असणारे सर्वच जण करतात. केवळ तरुणच नव्हे, तर ज्येष्ठांनाही फेसबुकची भुरळ पडली आहे. दिवसभर आपण कितीही व्यग्र असलो तरी फेसबुकवर एक नजर टाकतोच. पण अनेकदा आपण अशा काही चुका करतो की ज्या आपल्याला अडचणीत आणू शकतात.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण आपलं अकाऊंट लॉगआउट करणं विसरुन जातो. यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. फेसबुक अकाऊंट हॅक होण्याची शक्यता असते. बहुतेक वेळा आपण मित्र मंडळींच्या मोबाइलवर किंवा सायबर कॅफेमध्ये आपलं फेसबुक अकाऊंट लॉग आऊट करायला विसरतो. यावर एक नामी उपाय आहे. फेसबुकच्या सेटिंग्जमध्ये बदल करणं. जेणेकरुन कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. यासाठी पुढील सूचनांचे पालन करा..
स्मार्टफोनमध्ये 'अशी' करा सेटिंगफेसबुकचा सर्वाधिक वापर हा स्मार्टफोनमध्ये होतो. आपल्या फोन व्यतिरिक्त इतर कोणत्याही फोनमध्ये आपलं फेसबुक अकाऊंट आपण सुरू केलं असेल आणि लॉगआऊट करायला विसरलो तर चिंता करण्याचं कारण नाही.
>> सर्वात आधी आपल्या स्मार्टफोनमध्ये फेसबुक अॅप सुरू करा. त्यात सेटिंग्जच्या पर्यायावर क्लिक करा. यात सर्वात खाली स्क्रोल केल्यावर 'सिक्यूरिटी अँड लॉगइन' असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
>> त्यानंतर "Where you logged in" असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं अकाऊंट कोणकोणत्या Device वर लॉगइन आहे हे दिसेल.
>> आता तुम्हाला नको असलेल्या Device वरुन तुमचं फेसबुक अकाऊंट लॉगआऊट करता येईल. त्यासाठी तिथं दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर लॉगआऊट करण्यासाठीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर संबंधित Device वरुन तुमचं अकाऊंट लॉगआऊट होऊन जाईल.
>> गरज असल्यास तुम्ही संपूर्ण यादी सिलेक्ट करुन सर्वच Device वरुन अकाऊंट लॉगआऊट करता येईल.