शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

YouTube पासून किती कमाई होते? 1000 व्ह्यूजवर किती रुपये मिळतात? जाणून घ्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 15:42 IST

तस्लीमचा भाऊ फिरोजने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या YouTube चॅनलपासून चांगली कमाई होते. त्यांनी आतापर्यंत YouTube च्या माध्यमाने 1.20 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच, 40 लाख रुपयांचा इनकम टॅक्स देखील भरला आहे.

उत्तर प्रदेशात आयकर विभागाने एका यूट्यूबरच्या घरावर छापा टाकला आहे. या छाप्यात यूट्यूबरकडून 24 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तस्लीम खान असे या यूट्यूबरचे नाव आहे. तस्लीमवर चुकीच्या पद्धतीने कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप आहे. तस्लीम दोन वर्षांपासून आपल्या भावासोबत Trading Hub 3.0 हे यूट्यूब चॅनल चालवत आहेत. या प्लॅटफॉर्मवर ते शेअर मार्केटसंदर्भातील व्हिडिओ टाकतात.

अशात, प्रश्न असा उभा राहतो की, YouTube पासून नेमकी किती कमाई होईते? तर तस्लीमचा भाऊ फिरोजने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या YouTube चॅनलपासून चांगली कमाई होते. त्यांनी आतापर्यंत YouTube च्या माध्यमाने 1.20 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच, 40 लाख रुपयांचा इनकम टॅक्स देखील भरला आहे.

YouTube पासून किती होते कमाई? - YouTube क्रिएटर्सच्या कंटेन्टवर जाहिरातींच्या माध्यमाने येणारा रेव्हेन्यू शेअर करते. वेगवेगळ्या क्रिएटर्ससाठी रेव्हेन्यूचा शेअर वेगवेगळा असू शकतो. खरे तर YouTube वरून मिळणारे पैसे हे कंटेन्ट, प्रदेश आणि इतरही अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. रिपोर्टनुसार, क्रिएटर जाहिरातींमधून मिळणारा रेव्हेन्यू अगदी 55 टक्क्यांपर्यंतही मिळवू शकतात. 

ही अट महत्वाची - महत्वाचे म्हणजे, यूजर्सना यासाठी YouTube Partner Program चा भाग व्हावे लागते. या प्रोग्रामला क्वालिफाय होण्यासाठी  यूजर्सना चॅनलवर 500 सब्सक्रायबर्स आणि 3000 तासांचा वॉचिंग टाईम होणे आवश्यक आहे. YouTube Shorts च्या माध्यमानेही क्रिएटर्सना पैशांची कमाई होते.

2022 च्या डेटानुसार, अमेरिकेत यूट्यूबर्सची कमाई जवळपास, 4600 डॉलर (लगभग 3,77,234 रुपये) महिना झाली आहे. टक्केवारीचा विचार करता, यूट्यूब क्रिएटर्सना जवळपास 1000 व्ह्यूजवर 18 डॉलर (जवळपास 1558 रुपयांपर्यंत) मिळतात. कुठल्याही क्रिएटरची कमाई, त्याच्या कंटेंट, ऑडिअन्स, व्ह्यूज आणि सब्सक्रायबर्सवर अवलंबून असते. यूजर्स YouTube Shorts च्या माध्यमाने, मेंबरशिपच्या माध्यमाने आणि इतरही काही पद्धतीने पैसे मिळवू शकतात. 

टॅग्स :YouTubeयु ट्यूबtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय