नवी दिल्ली - WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअॅपच्या मदतीने फोटो, व्हिडीओ, ऑडीओ, डॉक्यूमेंट्स शेअर करता येतात. व्हॉट्सअॅपच्या अनेक ग्रुपमध्ये युजर्स अॅड असतात. त्या ग्रुपमध्ये सातत्याने मेसेज, फोटो अथवा व्हिडीओ हे येत असतात. मात्र हे फोटो स्मार्टफोनच्या गॅलरीमध्ये ऑटो सेव्ह होतात. आपोआप सेव्ह झालेल्या गोष्टींमुळे फोनची मेमरी लवकर भरते. तसेच युजर्सना ही नको असलेले फोटो डिलीट करावे लागतात.
व्हॉट्सअॅपवर आपोआप सेव्ह होणारे हे व्हिडीओ आणि फोटो अनेकदा युजर्सना नको असतात. मात्र या समस्येने ग्रस्त असलेल्या युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. स्मार्टफोनमध्ये फक्त एक सेटींग बदलून या समस्येपासून त्यांची सुटका होणार आहे. यामुळे आपोआप फोटो अथवा व्हिडीओ फोनमध्ये सेव्ह होणार नाहीत. अँड्रॉईड स्मार्टफोन आणि आयफोनमध्ये सेटींग बदलून असे करता येणार आहे.
अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये अशी बदला सेटींग
- सर्वप्रथम स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप ओपन करा.
- व्हॉट्सअॅप ओपन केल्यावर उजव्या बाजूला देण्यात आलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.- त्यानंतर सेटिंगवर क्लिक करा.
- यानंतर चॅट ऑप्शन निवडा.
- यामध्ये Media Visibility ऑन असलेलं दिसेल. ते ऑफ करा.
- या प्रक्रियेनंतर फोटो किंवा व्हिडीओ ऑटो डाऊनलोड होणार नाहीत.
iPhone मध्ये अशी बदला सेटींग
- आयफोनवर व्हॉट्सअॅप ओपन करा.
- आयफोनमध्ये उजव्या बाजूला असेलल्या कॉर्नरमध्ये असलेल्या सेटींगमध्ये जा.
- चॅटमध्ये Save to camera roll ऑन असेल तो ऑफ करा.
जाणून घ्या WhatsApp चे 9 सिक्रेट्स; वाढेल चॅटिंगचा आनंद
स्क्रीनशॉट न घेता असं सेव्ह करा WhatsApp स्टेटसइन्संट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. व्हॉट्सअॅपचं स्टेटस फीचर अत्यंत लोकप्रिय झालं असून युजर्सच्या ते आवडीचं आहे. या फीचरच्या मदतीने एखाद्या लिंकपासून ते व्हिडीओ, मीम्स, फोटो, हॉलीडे डेस्टीनेशनसारख्या सर्व गोष्टी शेअर करता येतात. यातील अनेक स्टेटस हे हवे असल्याने ते सेव्ह करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये स्क्रीनशॉट काढला जातो. मेसेजिंग अॅपमध्ये स्टेटस सेव्ह करण्याचा कोणताही पर्याय देण्यात आलेला नाही. मात्र हे स्टेटस सेव्ह करण्यासाठी काही ट्रिक्स आहेत.
सावधान! एक WhatsApp कॉल उडवणार सर्व डेटा; असा करा बचाव
व्हॉट्सअॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने अनेक जण त्याचा वापर करत असतात. व्हॉट्सअॅपही आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअॅप अपडेट करण्याची अनेकदा माहिती मिळते. मात्र युजर्स ती गोष्ट टाळतात. पण युजर्सची ही एक छोटीशी चूक त्यांना महागात पडू शकते. त्वरीत व्हॉट्सअॅप अपडेट करा कारण व्हॉट्सअॅपमध्ये एक बग सापडला आहे. Whatsapp कॉलच्या माध्यमातून हा बग स्पायवेअर इन्स्टॉल करण्याची परवानगी देतो. म्हणजेच स्मार्टफोनवर येणारा एखादा कॉल देखील धोकादायक ठरणार आहे. मग तो कॉल युजर्सने केला असेल अथवा युजर्सने तो रिसीव्ह केला असेल तरी त्याचा फटका बसणार आहे. फोनमधील सर्व डेटा, कॉल लॉग, ईमेल, मेसेज, फोटो, व्हिडीओ या सर्व गोष्टी बगमुळे डिलीट होऊ शकतात.
WhatsApp युजर्ससाठी Bad News; आता 'हे' खास फीचर मिळणार नाही
WhatsApp वर आलं नवं फीचर; नोटीफिकेशनमध्ये दिसणार स्टीकर्स
व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी स्टीकर्स फीचरमध्ये अपडेट आणत आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपमध्ये येणाऱ्या या नव्या अपडेटमध्ये ‘Sticker Notification Preview’ नावाचं नवं फीचर पाहायला मिळणार आहे. आयओएसच्या बीटा व्हर्जन 2.19.50.21 मध्ये हे फीचर देण्यात आले आहे. आता लवकरच अँड्रॉईड बीटावर देखील ते पाहायला मिळणार आहे. ‘Sticker Notification Preview’ हे फीचर व्हॉट्सअॅपवर आल्यानंतर अॅपवर एखादा मेसेज, स्टीकर, फोटो, व्हिडीओ आल्यावर नोटीफिकेशनमध्ये टेक्स्ट आणि इमोजी येणार आहे. स्टीकरसाठी नोटीफिकेशन बारमध्ये सध्या स्टीकर असं लिहिलेलं दिसतं. मात्र आता या नव्या फीचर नंतर युजर्सना पाठवलेला स्टीकर दिसणार आहे. तसेच मेसेज ओपन न करता कोणता स्टीकर पाठवण्यात आला आहे ते पाहता येणार आहे. व्हॉट्सअॅपचं नवं अपडेट गुगल प्ले स्टोरवर बीटा प्रोग्रामचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी आले आहे. या व्हर्जनमध्ये स्टीकर प्रिव्यू फीचरची चाचणी करण्यात येत आहे. तसेच व्हॉट्सअॅप Animated stickers वर देखील काम करत असल्याची माहिती मिळत आहे.