फोनमधून प्रायव्हेट फोटो लिक होणं ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही. आपण अनेकदा प्रायव्हेट फोटो लिक होण्याच्या बातम्या किंवा त्यामुळे घडलेल्या घटनांची माहिती समोर येत असते. फोनमध्ये सिक्युरिटी अॅप असतानाही मोबाइलमधून फोटो आणि व्हिडिओ लिक होत असतात. याची अनेक कारणं असू शकतात.
आपल्या फोनमधील खासगी फोटो किंवा व्हिडिओ लिक होणार नाहीत यासाठी काय करता येईल याचीच माहिती जाणून घेऊयात. सर्वात आधी मोबाइलचं तांत्रिक ज्ञान असणं ही अगदी प्राथमिक गोष्ट आहे. जर तुम्ही तुमचा एखादा खासगी फोटो सेंड केला आहे आणि समोरील व्यक्तीनं ते पुढे कुणाला पाठवले तर ते लिक होऊ शकतात. याशिवाय, जर तुमच्या फोनचा एखाद्याला अॅक्सेस मिळाला तरी तुमचे खासगी फोटो आणि व्हिडिओ लिक होऊ शकतात. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा फोन नेहमी लॉक मोडवर असणं गरजेचं आहे. तसंच चुकूनही खासगी फोटो शेअर करणं जितकं टाळता येईल तितकं उत्तम.
थर्ड पार्टी अॅप्सपासून राहा सावधफोटो आणि व्हिडिओ लिक होण्यात थर्ड पार्टी अॅप्स देखील कारणीभूत असतात. प्ले-स्टोअरवर असे अनेक मालवेअर अॅप्स आहेत की जे तुमच्याकडून मोबाइल अॅक्सेस संदर्भात वेगवेगळ्या परमिशन घेतात. अॅप्स डाऊनलोड करताना आपण अॅक्सेस परमिशन दिली की अॅप्स सहजपणे तुमच्या गॅलरीतील डेटा चोरी करू शकतात. फाइल्सचा रिमोट अॅक्सेस संबंधित अॅप्सना मिळतो. त्यामुळे प्ले-स्टोअरवरुन कधीही अधिकृत अॅप्स डाऊनलोड करण्यास प्राधान्य द्या. संशयित अॅप्स डाऊलोड करणं टाळा.
याशिवाय, सोशल इंजिनिअरिंगचा वापर करुन युझरला टार्गेट केलं जातं. यात युझरची सोशल टेक्निक पाहून जाळ्यात ओढलं जातं. यातून हॅकर्सना युझरचं अकाऊंट आणि पासवर्डची माहिती मिळते.
क्लाउड ड्राइव्हवरुनही होतो डेटा लिकक्लाउडचा वापर गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्सवर स्टोअर फोटो किंवा डॉक्युमेंट अॅक्सेस करण्यासाठी केला जातो. यापासून बचाव करण्यासाठी फिशिंग वेबसाइटवर कधीच वैयक्तिक माहिती देऊ नका. तसंच सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.