नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट, व्हिडीओ पाहण्यासाठी, कधी कधी कॉलवर बोलण्यासाठी हेडफोनचा वापर हा हमखआस केला जातो. मात्र आपल्या सततच्या वापरामुळे हेडफोन जॅक अनेकदा खराब होतो. मग अशा वेळी नेमकं काय करायचं असा प्रश्न हा युजर्सच्या मनात येतो. आतातर लॉकडाऊन सुरू असल्याने हेडफोन जॅक रिपेअर करण्याची दुकाने देखील सुरू नाहीत. पण तरीही चिंता करू नका कारण घरच्या घरी स्मार्टफोनचा हेडफोन जॅक कसा ठीक करायचा हे जाणून घेऊया...
- सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनचा हेडफोन तुटलेला आहे की नाही ते तपासा. हे तपासण्यासाठी, आपले हेडफोन कोणत्याही 3.5 मिमी जॅकमध्ये वापरण्याचा प्रयत्न करा. जर हेडफोन इतर कोणत्याही फोनमध्ये चालू असेल तर आपल्या फोनमध्ये एक समस्या आहे आणि नाही तर हेडफोन खराब झाला आहे. आता फोनचे हेडफोन जॅक ठीक करण्याऐवजी हेडफोनच बदलण्याची गरज आहे.
- जर स्मार्टफोन हा वायरलेस हेडफोन, स्पीकर्स किंवा ब्लूटूथद्वारे दुसर्या डिव्हाईसवर कनेक्ट केलेला असेल तर हेडफोन जॅक काम करण्याची शक्यता नाही. अनेकदा जेव्हा आपण आपले हेडफोन स्मार्टफोनमध्ये प्लग करतो तेव्हा स्मार्टफोनने लगेच रिकग्नाईझ केले पाहिजे. परंतु, हे करणे नेहमीच आवश्यक नसते. बर्याचदा फोनचे स्पीकर दुसर्या डिव्हाइससह ब्लूटूथशी कनेक्ट केले असतात. परंतु, याबद्दल माहिती नसते. अशात तुमचा फोन इतर कोणत्याही डिव्हाईससह ब्ल्यूटूथशी कनेक्ट केलेला आहे की नाही हे देखील तपासून पाहा. तसे असल्यास, ते डिस्कनेक्ट करा आणि हेडफोनचा वापर करा.
- हेडफोन जॅकमधील अनेकदा कचरा जमा होतो. त्याबद्दल आपल्याला माहिती नसते. अशा वेळी ते स्वच्छ करून तपासावे. आपण स्वच्छता केल्यानंतर हेडफोन जॅक तपासल्यास हेडफोन जॅक काम करण्यास सुरुवात करेल. ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कापसाचा उपयोग करू शकता. मात्र हे करताना अत्यंत सावध राहणं आवश्यक आहे. काळजी न घेतल्यास हेडफोन जॅकचे पिन खराब होऊ शकते.
- हेडफोन जॅकमध्ये काही त्रुटी नसून स्मार्टफोनमधील एखादी छोटी सेटिंग असल्यामुळे देखील या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. बर्याच वेळा स्मार्टफोनच्या सेटिंग बदलल्यामुळे ऑडिओ जॅक प्ले होत नाही. यासाठी आपल्याला फोनच्या सेटिंग्जवर जाण्याची आवश्यकता आहे. नंतर ऑडिओ उघडा आणि व्हॉल्यूम तपासा. जर चुकून ते म्यूट केले असेल तर ते अनम्यूट करा. असे केल्यावर, फोन रिस्टार्ट करा. यापैकी कोणत्याही टिप्स वापरुन तुमचा हेडफोन जॅक ठिक होत नसेल तर आपणास सर्व्हिस सेंटरमध्ये फोन दाखवावा लागेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....