शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

मस्तच! "असं" पाहा गुपचूप दुसऱ्यांचं Whatsapp स्टेट्स; Seen मध्ये दिसणार नाही तुमचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 3:22 PM

Whatsapp News : एकदा स्टेट्स ठेवल्यानंतर ते 24 तासांसाठी दिसतं.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या व्हॉट्सअ‍ॅप नव्या पॉलिसीमुळे जास्त चर्चेत आलं आहे. 2018 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपने आपलं स्टेटस फीचर आणलं. या फीचरच्या मदतीने युजर्स फोटो आणि व्हिडीओ स्टेटसला ठेवू शकतात. एकदा स्टेट्स ठेवल्यानंतर ते 24 तासांसाठी दिसतं. त्यानंतर ते आपोआप निघून जातं. आपलं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस कोणी कोणी पाहिलं हे युजरला सीनमध्ये दिसतं. मात्र अनेकदा एखाद्या व्यक्तीचं स्टेटस आपल्याला पाहायचं असतं. मात्र ते त्या व्यक्तीला समजायला नको अशी इच्छा असते. युजर्सची हीच इच्छा व्हॉट्सअ‍ॅपने पूर्ण केली आहे. 

एखाद्या व्यक्तीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाहिल्यानंतर आपलं नाव सीनमध्ये दिसणार नाही यासाठी काही ट्रिक्स आहेत. त्या ट्रिक्सच्या मदतीने कॉन्टॅक्ट लिस्टमधील कोणत्याही युजरचं स्टेटस लपून छपून पाहता येतं. तसेच त्या व्यक्तीला आपण स्टेटस पाहिलं हे माहितीही पडणार नाही. यासाठी सर्वप्रथम अँड्रॉईड किंवा आयफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. त्यानंतर तुमचं अकाऊंट ओपन करा आणि प्रायव्हसीवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला रीड रिसिप्टचा एक ऑप्शन दिसेल. आता तो ऑप्शन डिसेबल करा.

ऑप्शन डिसेबल केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ब्लू टिकचा ऑप्शन देखील बंद होईल. हा ऑप्शन बंद झाल्यानंतर तुम्हाला कोणताही मेसेज आला असेल तर तुम्हाला समजेल मात्र तुम्ही तो मेसेज वाचला की नाही, हे समोरच्या व्यक्तीला माहिती पडणार नाही. याचाच अर्थ तुम्ही कोणाचेही मेसेज वाचू शकता पण त्याला कळणार नाही की तुम्ही त्याचे मेसेज वाचले आहेत की नाही. याच पद्धतीने या ऑप्शनला डिसेबल केल्यानंतर युजर्सचे स्टेट्स पाहिल्यानंतर त्यांना तुम्ही त्यांचे स्टेट्स पाहिले की नाही हे समजणार नाही. तसेच तुमचं नाव सुद्धा सीन लिस्टमध्ये दिसणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

WhatsApp अकाऊंट डिलीट केल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत धोका; कधीही लीक होऊ शकतं चॅट

व्हॉट्सअ‍ॅपसंबंधित रोज नवनवीन माहिती ही समोर येत असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोक मोठ्या प्रमाणात या नव्या पॉलिसीचा विरोध करताना पाहायला मिळत आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीबाबत युजर्समध्ये नाराजी असतानाच आता अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं अकाऊंट डिलीट केल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत धोका असून चॅट लीक होऊ शकत असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही नवी पॉलिसी आठ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आणलेल्या नवा पॉलिसीमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. अनेकांनी तर या नव्या पॉलिसीचा धसका घेतला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे युजर्स आपला डेटा प्रायव्हेट ठेऊ इच्छित असल्यास, त्यांना अ‍ॅप अनइन्स्टॉल नाही, तर डिलीट करावं लागेल. जर अकाऊंट डिलीट केलं नाही, तर डेटा व्हॉट्सअ‍ॅपकडे राहील. तसेच अकाऊंट डिलीट केल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत युजर्सचा डेटा व्हॉट्सअ‍ॅपकडे राहतो. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजर्स, दुसऱ्या मेसेजिंग अ‍ॅपकडे स्विच होत आहेत. त्यामुळे अनेकजण आपल्या फोनमधून व्हॉट्सअ‍ॅप थेट अनइन्स्टॉल करत आहेत. मात्र हा योग्य पर्याय नाही. दुसऱ्या अ‍ॅपवर स्विच होताना व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट डिलीट करणं आवश्यक आहे. अँड्रॉईड युजर्सला व्हॉट्सअ‍ॅपचे अकाउंट डिलीट करण्यासाठी मेन स्क्रिनवर बाजूला दिलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर सेटिंग्समध्ये अकाऊंट ओपन करुन डिलीट माय अकाउंटवर क्लिक करावं. फोन नंबर टाकावा लागेल आणि नंतर डिलीट माय अकाऊंटवर क्लिक करावं लागेल. यावेळी अकाऊंट डिलीट करण्याचं कारण विचारलं जाईल. यात कारण सांगून पुढील प्रोसेस होईल. एकदा अकाऊंट डिलीट झाल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपकडे युजर्सचा डेटा राहतो.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान