शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

How to: अशाप्रकारे मिळावा एयरटेलची मोफत कॉलर ट्यून  

By सिद्धेश जाधव | Published: July 05, 2021 4:19 PM

Free Caller tune on Airtel: विंक अ‍ॅपवरील हॅलो ट्यून्स पूर्णपणे मोफत आहेत. एकदा सेट केलेली हॅलो ट्यून तुम्ही कोणत्याही अतिरिक्त चार्जविना बदलू देखील शकता.

एकेकाळी कॉलर ट्यून सेवेसाठी टेलिकॉम कंपन्या 30 रुपये प्रति महिना आकारात होते. परंतु आता सर्वच टेलिकॉम ऑपरेटर्स आपल्या ग्राहकांना मोफत कॉलर ट्यून देत आहेत. त्यामुळे जर तुम्ही एयरटेलचे ग्राहक असाल तर तुम्ही Airtel च्या Wynk Music अ‍ॅपचा वापर करून तुमच्या प्रीपेड आणि पोस्टपेड नंबरसाठी मोफत कॉलर ट्यून सेट करू शकता. विंक अ‍ॅपवरील हॅलो ट्यून्स पूर्णपणे मोफत आहेत. एकदा सेट केलेली हॅलो ट्यून तुम्ही कोणत्याही अतिरिक्त चार्जविना बदलू देखील शकता. (How to set caller tune for Airtel using wynk music app)  

एयरटेल नंबरवर मोफत हॅलो ट्यून सेट करण्यासाठी पुढील सोप्पी पद्धत वापरा:  

  • अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोर किंवा गुगल प्ले स्टोरवरून Wynk Music App डाउनलोड करा.  
  • तुमच्या पोस्टपेड किंवा प्रीपेड एयरटेल नंबरचा वापर करून विंक म्युजिक अ‍ॅपवर रजिस्टर करा.  
  • अ‍ॅपच्या होम स्क्रीनवर उजवीकडे वरच्या बाजूला असलेल्या Airtel Hellotunes च्या आयकॉनवर टॅप करा.  
  • तुमच्या आवडीचे किंवा तुम्हाला जे गाणं कॉलर ट्यून म्हणून हवं आहे ते शोधा.  
  • गाणं सापडलं कि त्यावर टॅप करून ‘Activate for free’ ऑप्शनवर टॅप करा. 

तुम्ही तुमच्या एयरटेल नंबरवरून 543211 या टोल नंबरवर कॉल करून देखील कॉलर ट्यून सेट करू शकता. तसेच ‘SET space सॉंग कोड’ असा एसएमएस 543211 पाठवून देखील कॉलर ट्यून सेट करता येईल.  

कॉलर ट्यून बंद कशी करायची?  तुमच्या एयरटेल नंबर वरची कॉलर ट्यून तुम्ही अगदी सहज बंद करू शकता. त्यासाठी Wynk Music अ‍ॅपवरील डावीकडील मेनूमध्ये जात. तिचे Manage Hello Tunes ऑप्शन निवडून थ्री डॉट मेनू सिलेक्ट करा. त्यानंतर Stop Hello Tune ची निवड करा. 

टॅग्स :Airtelएअरटेलtechnologyतंत्रज्ञान