अनेकदा आपण टेलिमार्केटिंग कंपन्यांच्या कॉल्समुळे कंटाळतो. परंतु अनेकदा आपल्याला काही जणांचे फोनही उचलण्याचा कंटाळा आलेला असतो. आपण काही कामात असतो किंवा काही चित्रपट पाहत असतो, बाहेर असतो आणि अशाच वेळी फोनची रिंग वाजते आणि आपल्याला तो नकोसाही वाटतो. अशा परिस्थितीत आपण आपला फोन Airplane मोडवर टाकतो.Airplane मोडचा वापर केल्यावर सर्वच प्रकारची कनेक्टिव्हीटी बंद होते. स्मार्टफोन्सवर कॉल्स येणारच नाहीत पण तुमची इंटरनेट सेवाही बंद होईल. यासाठी या मोडचा वापर तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. आज आपण अशी एक गोष्ट पाहू ज्यानं तुम्हाला तुमचा फोन Airplane मोडवरही टाकावा लागणार नाही आणि इनकमिंग कॉल्सपासूनही सुटका होईल. सर्वप्रथम आपल्या फोनच्या सेटिंग्समध्ये जा. त्यानंतर कॉल फॉरवर्डिंग ऑप्शनवर क्लिक करा. त्याठिकाणी Always forward, Forward when busy आणि Forward when unanswered असे ऑप्शन्स दिसतील. त्या ठिकाणी असलेल्या Always forward वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा बंद असलेला क्रमांक त्या ठिकाणी टाका. त्या ठिकाणी असलेल्या अनेबल बटनवर टॅप करा. त्यानंतर तुम्हाला कोणतेही कॉल्स येणार नाहीत. तसंच ज्यावेळी तुम्ही कॉल उचलणार असाल त्यावेळी call forwarding ऑप्शन बंद करा.
नको असलेल्या कॉल्समुळे हैराण झालात? मग आता Airplane मोड शिवायही अशी करा सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 4:37 PM
Mobile phone Calls : Airplane मोडशिवाय आणखी एका पर्यायाचाही होऊ शकतो वापर.
ठळक मुद्दे Airplane मोडशिवाय आणखी एका पर्यायाचाही होऊ शकतो वापरकॉल येत नसले तरी तुम्हाला इंटरनेट सेवा वापरता येऊ शकते.