Google Maps: Google मॅप्स खूप लोकप्रिय नेव्हिगेशन ॲप आहे. या अॅफच्या मदतीने तुम्ही अगदी सहजरित्या तुम्हाला हव्या त्या पत्त्यावर पोहचू शकता. आजकाल बहुतांश लोक गुगल मॅपचा वापर करतात. या ॲपमध्ये पत्ता सांगणे/रस्ता दाखवण्यासोबतच इतर अनेक फीचर्स आहेत. हे तुम्हाला चालान लागण्यापासून रोखण्यात मदत करू शकतात. आज आम्ही तुम्हाला या फीचर्सबद्दल सांगणार आहोत.
स्पीड लिमिट अलर्ट: हे फीचर तुमचा वेग ट्रॅक करेल आणि जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवत असाल, तर तुम्हाला अलर्ट जारी करेल. यामुळे तुमचे चालान कापले जाणार नाही.
स्पीड कॅमेरा अलर्ट: हे फीचर तुम्हाला तुमच्या मार्गावर येणाऱ्या स्पीड कॅमेऱ्यांबद्दल माहिती देईल. याच्या मदतीने तुम्ही स्पीड कॅमेरे टाळू शकता.
ट्रॅफिक अलर्ट: या फीचरच्या मदतीने तुम्हाला रस्त्यावरील गर्दी आणि इतर अडथळ्यांबद्दल माहिती मिळेल. यामुळे तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकण्यापासून वाचू शकता.
हे फीचर्स सुरू करण्यासाटी तुम्हाला तुमच्या Google मॅपच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल. त्यानंतर, "नेव्हिगेशन" टॅबवर जा आणि "ड्रायव्हिंग पर्याय" निवडा. यानंतर तुम्ही टॉगल स्विच चालू करा.
चालानपासून वाचण्यासाठी या टिप्स फॉलो करता:1.नेहमी वेग मर्यादा पाळा.2. वाहतूक नियमांचे पालन करा.3. ड्रायव्हिंग लायसन्स, विमा आणि इतर आवश्यक कागदपत्रे नेहमी सोबत ठेवा.