वर्क फ्रॉम होममुळे घरातील वाय-फायचं महत्व वाढलं आहे. त्यात घरातील डिवाइसेसची संख्या वाढली आहे त्यामुळे वाय-फायचा स्पीड देखील कमी होतो. त्यामुळे काम एकतर पूर्ण होत नाही किंवा त्याला लागणार वेळ वाढतो. यावर उपाय शोधण्यासाठी आपण इंटरनेटकडे वळतो आणि तिथे असे एक एक उपाय सांगितलेले असतात कि गोंधळ उडतो. आज आपण असाच एक उपाय पाहणार आहोत ज्यामुळे वाय-फायचा स्पीड वाढतो, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
सध्या एक ट्रिक सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. या ट्रिकच्या मदतीनं आपल्या वाय-फायचा स्पीड वाढल्याचा दावा लोक करत आहेत. या ट्रिकमध्ये कोणतीही सेटिंग बदलायची नाही कि कमांड द्यायची नाही. फक्त एका सोडा ड्रिंकच्या रिकाम्या अॅल्युमिनियम कॅनचा वापर करण्याची गरज आहे. हा कॅन राऊटरच्या अँटीन्याला जोडायचा आहे.
यासाठी एक रिकामा सोडा कॅन घ्या. त्याला मधोमध कट करा. हा कापलेला कॅन वाय-फाय राउटरच्या अँटीन्याच्या मागे फिट करा. त्यानंतर काही मिनिटांतच तुमच्या वाय-फायचा वेग आणि रेंज वाढेल. परंतु सोशल मीडियावरील या ट्रिकमध्ये जास्त तथ्य नाही. यामुळे स्पीड वाढत नाही फक्त एका विशिष्ट दिशेनं तो सिग्नल पाठवण्यासाठी उपयोग मात्र केला जाऊ शकतो. त्यामुळे जर तुमच्या घरी जास्त डिवाइसेस असतील तर या ट्रिकवर वेळ वाया घालवू नका.
हे देखील वाचा:
5,000mAh बॅटरी आणि स्टायलस सपोर्टसह गुपचूप आला Motorola चा दमदार स्मार्टफोन, दिसतोही जबरदस्त
19GB RAM च्या ताकदीसह OPPO Reno 7 Pro 5G भारतात लाँच; मिळतेय DSLR सारखी कॅमेरा सिस्टम