व्हॉट्सअॅप काही दिवसांपूर्वी एक नवीन फिचर सादर केलं होतं. ज्याच्या मदतीनं युजर्स एखाद्या मेसेजला रिप्लाय देण्याऐवजी फक्त रिअॅक्ट करू शकतात. या फिचरचा फायदा असा की एखाद्या मोठ्या ग्रुपमध्ये एका मेसेजवर लोकांची रिअॅक्शन एकाच ठिकाणी मिळू शकते, त्यासाठी येणारे रिप्लाय वाचत बसण्याची गरज नाही. तसेच मेसेजवर ‘ओके’ रिप्लाय करण्याऐवजी तुम्ही फक्त ‘थम्स अप’ रिअॅक्ट करून तुमचा रिप्लाय कळवू शकता किंवा ‘हाहा’ ची इमोजी शोधण्याऐवजी ‘हाहा’ रिअॅक्ट करू शकता.
हे रिअॅक्शन फिचर सध्या व्हॉट्सअॅपवर आलं आहे, परंतु इंस्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजवर खूप आधीपासून उपलब्ध आहे. याचा वापर करण्यासाठी तुम्हाला मेसेजवर टॅप आणि होल्ड करून आलेल्या एका इमोजीची निवड करावी लागते. परंतु कधी कधी चुकीची रिअॅक्शन दिली जाते. एखाद्या गंभीर मेसेजवर ‘हाहा’ रिअॅक्ट समोरच्या व्यक्तीचा गैरसमज होऊ शकतो.
अशावेळी काय करावं? पाठवलेला चुकीचा मेसेज डिलीट करता येतो. परंतु चुकीचं रिअॅक्शन कसं डिलीट करायचं? किंवा रिअॅक्शन कसं बदलायचं? याची माहिती आम्ही पुढे दिली आहे. अगदी सोप्प्या स्टेप्स फोल्लो करून तुम्ही एखाद्या व्हॉट्सअॅपवरील रिअॅक्शन डिलीट करू शकता किंवा बदलू देखील शकता.
How To Delete And Change A Whatsapps Message Recation
- सर्वप्रथम फुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप ओपन करा.
- आता त्या चॅटवर जा जिथे तुम्हाला मेसेज रिअॅक्शन डिलीट किंवा चेंज करायची आहे.
- आता त्या मेसेजवर टॅप आणि होल्ड करा ज्यावर तुम्ही आधी रिअॅक्ट केलं होतं.
- जर तुम्हाला रिअॅक्शन डिलीट करायची असेल तर त्याच इमोजीवर टॅप करा जी तुम्ही आधी रिअॅक्शनमध्ये वापरली होती.
- जर तुम्हाला रिअॅक्शन बदलायची असेल तर मेसेजवर टॅप आणि होल्ड करा आणि नवीन इमोजीवर टॅप करा.